शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

JOB Alert : सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; 'या' बँकेत मॅनेजरच्या 511 पदांवर भरती, असा करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 12:44 PM

Bank Job 2021 : नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आता एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

नवी दिल्ली - सरकारी बँकेतनोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आता एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदा(Bank of Baroda) ने मॅनेजर पदासाठी बंपर भरती जारी केली आहे. यामध्ये (Bank Manager Recruitment 2021) एकूण 511 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. बँक मॅनेजर पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार बँक ऑफ बडोदाचे अधिकृत संकेतस्थळ bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. याबाबत एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. 

अर्ज कसा करावा?

- सर्वप्रथम bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर जा.

- होम पेजवरील Career सेक्शनवर क्लिक करा.

- करिअर विभागात असलेल्या Recruitment Project सेक्शनवर क्लिक करा.

- यामध्ये “Recruitment for Wealth Management Services Department” या लिंकवर क्लिक करा.

- आता Link to Apply वर जा. पुढील पानावर Application form ओपन होईल.

- आवश्यक तपशील भरा आणि सबमिट करा. शेवटी निश्चित फी जमा करुन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता.

कोण अर्ज करू शकेल?

विविध पदांसाठी भरती केली जाईल. यामध्ये सर्वाधिक भरती व्यवस्थापक पदासाठी आहे. मॅनेजरच्या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी पूर्ण केलेली असली पाहिजे. तसेच फक्त फायनान्स सर्व्हिसचा अनुभव असलेले उमेदवारच अर्ज करू शकतात. याशिवाय संबंधित क्षेत्रात दोन वर्षांचे मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे अनिवार्य आहे. उमेदवारांकडून एनआयएसएम / आयआरडीएकडे नियामक प्रमाणपत्र मागितले गेले आहे. 

'या' पदांवर होईल भरती

भरतीमध्ये एकूण व्यवस्थापकांच्या 511 पदांवर भरती होईल. 

सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर – 407 पद

ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 50 पद

टेरीटरी हेड – 44 पद

ग्रुप हेड – 6 पद

प्रोडक्ट हेड (Investment & Research) – 1 पद

हेड (Operation & Technology) – 1 पद

डिजिटल सेल्स मॅनेजर – 1 पद

आयटी फंक्शनल एनालिस्ट-मॅनेजर – 1 पद 

एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Bank of Indiaबँक ऑफ इंडियाbankबँकjobनोकरीIndiaभारत