लग्नासाठी नकार मिळताच प्रेयसीच्या तळपायाची आग मस्तकात, प्रियकराला दिली भयंकर शिक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:51 IST2026-03-10T15:50:50+5:302026-03-10T15:51:35+5:30

झारखंडमधील सराईकेला खरसावां जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका प्रेयसीने आपल्याच प्रियकराची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर जे घडलं, हे पाहून संपूर्ण गाव हादरले.

Jharkhand Shocking News Upon being rejected for marriage, the lover was hit in the head with the sole of his foot, a terrible punishment was given to the lover! | लग्नासाठी नकार मिळताच प्रेयसीच्या तळपायाची आग मस्तकात, प्रियकराला दिली भयंकर शिक्षा!

लग्नासाठी नकार मिळताच प्रेयसीच्या तळपायाची आग मस्तकात, प्रियकराला दिली भयंकर शिक्षा!

झारखंडमधील सराईकेला खरसावां जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका प्रेयसीने आपल्याच प्रियकराची हत्या केली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी प्रेयसीसह तिच्या भाऊ आणि बहिणीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. 

विजय कुमार दास (वय, २९) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय कुमार हा गेल्या २४ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. दरम्यान, ३ मार्चला नातेवाईकांनी विजय कुमार बेपत्ता झाल्याचे पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी विजयचा शोध सुरू केला असता ७ मार्च रोजी रांची येथील एका विहिरीत एका व्यक्तीचा मृतदेह गोणीत भरलेल्या अवस्थेत आढळला. पोलीस चौकशीत हा मृतदेह विजय याचा असल्याचे निष्पन्न झाले. 

याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. विजयचे रोशनी देवी (वय, २९) नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. रोशनी त्याच्याकडे लग्नासाठी तगादा लावत होती, मात्र विजयने लग्नास नकार दिला. याच रागातून रोशनीने त्याला संपवण्याचा कट रचला. रोशनीने विजयला घरी बोलावून घेतले आणि दारू पाजली. विजय दारूच्या नशेत असताना रोशनीने तिचा भाऊ भूपेश बैठा आणि बहीण सीमा देवी यांच्या मदतीने विजयची धारदार शास्त्रांनी गळा चिरला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह गोणीत भरला आणि दुचाकीवरून नेऊन एका विहिरीत फेकून दिला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

Web Title : शादी से इनकार पर प्रेमिका ने प्रेमी को बेरहमी से मार डाला।

Web Summary : झारखंड में, एक महिला ने शादी से इनकार करने पर अपने प्रेमी की हत्या कर दी। उसने अपने भाई-बहनों के साथ मिलकर धारदार हथियारों से उसकी हत्या कर दी और शव को एक कुएं में फेंक दिया। पुलिस ने तीनों को गिरफ्तार कर लिया है और जांच कर रही है।

Web Title : Rejection leads to gruesome murder: Lover killed by girlfriend.

Web Summary : In Jharkhand, a woman killed her lover after he refused to marry her. She, along with her siblings, murdered him with sharp weapons and disposed of the body in a well. Police have arrested the trio and are investigating.