जयललितांवर टीका पडली महागात, गायक कोवनवर देशद्रोहाचा गुन्हा

By Admin | Updated: October 30, 2015 16:18 IST2015-10-30T16:18:39+5:302015-10-30T16:18:39+5:30

कोवन किंवा एस. शिवदास या अत्यंत लोकप्रिय अशा तमिळ लोकगायकाला पोलीसांनी मध्यरात्री देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे

Jayalalithaa criticized in the price, the crime of sedition by the singer Kovan | जयललितांवर टीका पडली महागात, गायक कोवनवर देशद्रोहाचा गुन्हा

जयललितांवर टीका पडली महागात, गायक कोवनवर देशद्रोहाचा गुन्हा

>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. ३० - कोवन किंवा एस. शिवदास या अत्यंत लोकप्रिय अशा तमिळ लोकगायकाला पोलीसांनी मध्यरात्री देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. त्याचा गुन्हा आहे त्याने मुख्यमंत्री जयललितांवर जहाल टीका असलेली गाणी गायली आणि ती सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात ऐकली गेली. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यानंतर राज्य सरकारने देशद्रोहासंदर्भातले परीपत्रक मागे घेतल्याची घोषणा कालच करण्यात आली, परंतु तमिळनाडूमध्ये मात्र सत्ताधारी राजकारण्यांवरील टीका देशद्रोह मानण्यात येत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.
मद्यप्राशनासंदर्भातल्या राज्य सरकारच्या धोरणावर टीका केलेली दोन गाणी कोवमने गायली आहेत. कोवनच्या बाबतीत न्यायालयानेच हस्तक्षेप करावा अशी याचिका त्याच्या वतीने वकिल जिम राज मिल्टन यांनी मद्रास हायकोर्टात केल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. 
काव्य, संगीत व कला या क्षेत्रांमध्ये ज्यांना दूर ढकलले गेले आहे, अशांना सहाय्य करण्यासाठी झटणा-या चळवळींशी कोवन निगडीत आहेत.

Web Title: Jayalalithaa criticized in the price, the crime of sedition by the singer Kovan