जम्मूत सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक पोलीस शहीद

By Admin | Updated: November 16, 2016 10:27 IST2016-11-16T10:27:21+5:302016-11-16T10:27:21+5:30

जम्मू-काश्मीर येथील सोपोर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत एक पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत.

Jammu security forces and militants, one police martyr | जम्मूत सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक पोलीस शहीद

जम्मूत सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये चकमक, एक पोलीस शहीद

ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. 16 - जम्मू-काश्मीर येथील सोपोर परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत एक पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत. शहीद झालेले पोलीस अधिकारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झाले होते.

सोपोर येथील झालूरा वनक्षेत्रात ही चकमक सुरू होती. अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती मिळते आहे. दहशतवादी जंगलात लपून बसले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  

मात्र एकूण किती दहशतवादी आहेत, याची ठोस माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, जवानांनी संपूर्ण परिसरला वेढा घातला असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. 

 

Web Title: Jammu security forces and militants, one police martyr