शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

40 किलो स्फोटकं, संरक्षणदलावर निशाणा; आयजींनी सांगितला पुलवामामध्ये असा होता दहशतवाद्यांचा 'प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 1:55 PM

गेल्या वर्षीही पुलवामामध्ये अशाच पद्धतीचा कट आखून दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यात CRPF च्या जवळपास 45 जवानांना हौतात्म्य आले होते. 

ठळक मुद्देगेल्या आठवडाभरापासूनच माहिती मिळत होती, की जैश ए मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिदीन एकत्रितपणे, अशा प्रकारचा हल्ला करू शकतात.आयईडी डिफ्यूज केल्यानंतर एक स्फोट झाला. यावेळी आकाशात जवळपास 50 फुट उंच धुराचे लोळ उठले होते.गेल्या वर्षीही पुलवामामध्ये अशाच पद्धतीचा कट आखून दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यात 45 जवानांना हौतात्म्य आले होते.

पुलवामा : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये संरक्षण दलाच्या जवानांनी आज (गुरुवार) दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. येथे एका गाडीत मोठ्या प्रमाणावर IED होते. संरक्षण दलाच्या जवानांनी ते ट्रॅक करून डिफ्यूज केले. यावर, संरक्षण दलाच्या जवानांना निशाणा बनवण्याचा दहशतवाद्यांचा कट होता, असा दावा जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक (आयजी) विजय कुमार यांनी केला आहे.

पत्रकारांशी बोलताना विजय कुमार म्हणाले, "गेल्या आठवडाभरापासूनच माहिती मिळत होती, की जैश ए मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिदीन एकत्रितपणे, अशा प्रकारचा हल्ला करू शकतात. यानंतर आम्ही सातत्याने ट्रॅकिंग करत होतो. काल सायंकाळी पोलिसांनी लष्कर आणि सीआरपीएफच्या मदतीने कारचा पाठलाग केला. आम्ही नाक्यावर वॉर्निंग फायरही केले. मात्र, दहशतवाद्यांनी गाडी थांबवली नाही."

Video : पुलवामामध्ये जवानांनी 'अशी' उडवली दहशतवाद्यांची IEDने भरलेली कार, 3 दिवसांपूर्वीच मिळाले होते 'इनपुट'

विजय कुमार यांनी सांगितल्यानुसार, पुढील नाक्यावरही जवानांनी फायरिंग केली. मात्र, तेथे अंधार असल्याने, ते पळून गेले. यानंर आम्ही गाडी जप्त करून तिची तपासणी केली. यात मोठ्या प्रमाणावर IED सापडले. यानंतर आम्ही IED चेक केले आणि नंतर ते डिफ्यूज केले. दहशतवाद्यांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट आखला होता. मात्र, तो उधळून लावण्यात आला आहे. 

युद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज

विजय कुमार म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून या लोकांचा, असे काही करण्याचा कट होता. मात्र, त्यांना ते करता आले नाही. म्हणून ते आता प्रयत्न करत होते. मात्र आम्ही त्यांचा कट उधळून लावला. हे लोक पोलीस अथवा संरक्षण दलाला निशाणा बनवू शकत होते. या गाडीत जवळपास 40-45 किलो. स्फोटक होते.

सीमा वादातून नेपाळची माघार, भारताचा भूभाग नकाशात दाखविण्याचा प्रस्ताव घेतला मागे

जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएसह इतर संरक्षण दलाच्या जवानांनी ही कारवाई केली. संबंधित गाडी दक्षीण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात रजपुरा रोडजवळ अडवण्यात आली. यानंतर बॉम्ब डिस्पोझल स्क्वॅयडला पाचारण करण्यात आले. यावेळी गाडीजवळील परिसर आणि घरे रिकामी करण्यात आली होती. आयईडी डिफ्यूज केल्यानंतर एक स्फोट झाला. यावेळी आकाशात जवळपास 50 मीटर उंच धुराचे लोळ उठले होते. यात केवळ गाडीचेच नुकसान झाले आहे.

POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

गेल्या वर्षीही पुलवामामध्ये अशाच पद्धतीचा कट आखून दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यात CRPF च्या जवळपास 45 जवानांना हौतात्म्य आले होते. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPoliceपोलिसPakistanपाकिस्तानJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद