तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी जमीरखाँ यांची निवड

By Admin | Updated: August 23, 2015 20:40 IST2015-08-23T20:40:16+5:302015-08-23T20:40:16+5:30

महान : येथील तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी जमीरखाँ नबीखॉ यांची शनिवारी ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आलेल्या सभेत सर्वानुमते निवड करण्यात आली.

Jamirkhana elected the President of the Tantra-free village committee | तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी जमीरखाँ यांची निवड

तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी जमीरखाँ यांची निवड

ान : येथील तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी जमीरखाँ नबीखॉ यांची शनिवारी ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आलेल्या सभेत सर्वानुमते निवड करण्यात आली.
महान येथील तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी यापूर्वी सै.बढे सै.करीम यांची निवड करण्यात आली होती. परंतु, यावेळी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी मो.अकबर अ.कलीम यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सभा घेण्यात आली. या सभेत तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्ष पदाकरिता सै.बढे सै.करीम यांच्यासह जमीरखाँ नबीखॉ व काजीमखाँ सुभानखाँ यांची नावे उपस्थित नागरिकांनी सुचविली. नागरिकांनी एकापेक्षा जास्त व्यक्तीची नावे सुचविल्यामुळे हात वर करून मतदान घेण्यात आले. तेव्हा सर्वात जास्त नागरिकांनी जमीरखाँ नबीखाँ यांच्या बाजूने कौल दिल्यामुळे महान तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी जमीरखाँ नबीखाँ यांनी निवड करण्यात येत असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तंटामुक्त समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष जमीरखाँ यांनी महान ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाचा कार्यभारही यापूर्वी सांभाळला होता. (वार्ताहर)
२२ सीटीसीएल२९ : जमीरखाँ नबीखाँ.
०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

Web Title: Jamirkhana elected the President of the Tantra-free village committee