जेटलींचा पाकला दम

By Admin | Updated: June 15, 2014 03:07 IST2014-06-15T03:07:29+5:302014-06-15T03:07:29+5:30

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार केल्या जाणाऱ्या युद्धबंदीच्या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर देण्यास भारताचे सशस्त्र दल सक्षम आहे

Jaitley's Pakal Dum | जेटलींचा पाकला दम

जेटलींचा पाकला दम

श्रीनगर : नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार केल्या जाणाऱ्या युद्धबंदीच्या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर देण्यास भारताचे सशस्त्र दल सक्षम आहे, अशी ग्वाही देत संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी पाकला दम भरला. आपण राज्य सरकार आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सुरक्षाविषयक मुद्यांची समीक्षा करणार असल्याचे जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसांच्या भेटीवर आलेले जेटली यांनी पत्रकारांना सांगितले. युद्धबंदीचे वारंवार होत असलेले उल्लंघन आणि प्रामुख्याने त्यांच्या या दौऱ्याच्या आधी करण्यात आलेल्या युद्धबंदी उल्लंघनाबाबत विचारले असता जेटली म्हणाले, ‘आमची सशस्त्र दले या युद्धबंदी उल्लंघनाला प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहेत.’

 

Web Title: Jaitley's Pakal Dum