शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

बिहारात काँग्रेस जनता परिवारासोबत जाणार जयराम रमेश यांचे संकेत

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

हैदराबाद : जनता परिवाराच्या बहुचर्चित विलीनीकरणाची घोषणा होणे अद्याप बाकी असतानाच, आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत या परिवारासोबत आघाडी करण्यास काँग्रेस उत्सुक असल्याचे चित्र आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी रविवारी याबाबतचे संकेत दिले. बिहारात भाजपला रोखल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आपोआप कमी होईल, असेही ते म्हणाले.

हैदराबाद : जनता परिवाराच्या बहुचर्चित विलीनीकरणाची घोषणा होणे अद्याप बाकी असतानाच, आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत या परिवारासोबत आघाडी करण्यास काँग्रेस उत्सुक असल्याचे चित्र आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी रविवारी याबाबतचे संकेत दिले. बिहारात भाजपला रोखल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आपोआप कमी होईल, असेही ते म्हणाले.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रमेश बोलत होते. जनता परिवाराच्या एकीचे आम्ही स्वागत करतो. बिहारात जनता परिवारातील पक्ष, काँग्रेस सर्वांचीच कसोटी आहे. दिल्लीतील यंदाच्या निवडणुकीत मोदींना ध्वस्त केले. दिल्लीप्रमाणे बिहारातही भाजपला रोखले जात असेल तर मोदी लाट निष्प्रभ ठरेल. त्यामुळे भाजपविरोधी शक्तींनी जनता परिवारासोबत येणे या घडीला एक योग्य घटनाक्रम आहे, असे रमेश यावेळी म्हणाले.
काँग्रेसची जदयुसोबत राजनैतिक भागीदारी असेल का? या प्रश्नाला उत्तर देताना, काँग्रेसने बिहारात नितीशकुमार सरकारला पाठिंबा दिला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अविश्वास प्रस्तावाच्या वेळी आम्ही नितीशकुमार यांच्या बाजूने होतो, असे ते म्हणाले. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुका जिंकणे, हे काँग्रेसचे पुढील लक्ष्य आहे. मात्र तत्पूर्वी यावर्षी नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला रोखण्याची आमची योजना आहे. बिहारात भाजपला रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व काही करण्यास आम्ही तयार आहोत. देशपातळीवरही याचा मोठा प्रभाव दिसेल, असेही त्यांनी सांगितले.

बॉक्स
डाव्या पक्षांची स्थिती पाहून दु:ख होते
डाव्या पक्षांची स्थिती बघून मला दु:ख होते. डाव्या पक्षांचा सुरूअसलेला र्‍हास योग्य नाही. डावी शक्ती ही धर्मनिरपेक्ष मूल्याची शक्ती आहे. काँग्रेस आणि डावे पक्ष केरळ, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरात परस्पराचे प्रतिस्पर्धी आहेत. मात्र हे मी एक प्रतिस्पर्धी म्हणूनच सांगतो आहे. भाजप वाढलेला मला नको; पण राजकीय विरोध असूनही डावी शक्ती आणखी मजबूत झालेली बघायला मला आवडेल, असे रमेश म्हणाले.