शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

जगमोहन रेड्डींना महिला आमदारांनी बांधली राखी तर दिशाच्या वडिलांनी मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 10:00 IST

आंध्र प्रदेश विधानसभेत दिशा अ‍ॅक्ट 2019 साठी मंजूरी देण्यात आली आहे.

हैदराबाद - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डींनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात महिलांच्या सुरक्षेसंदर्भात स्पष्ट संकेत दिले होते. त्यानुसार, बलात्कार प्रकरणात सर्वात कडक आणि तात्काळ शिक्षा देण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने दिशा अ‍ॅक्ट नावाने नवीन कायदा लागू केला आहे. शुक्रवारी आंध्र प्रदेशच्या विधानसभेत या कायद्याला संमती देण्यात आली आहे. त्यानंतर, तेथील महिला आमदारांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींना राखी बांधून त्यांचे आभार मानले. तर, दिशाच्या वडिलांनीही जगनमोहन यांना धन्यवाद दिले.  

आंध्र प्रदेश विधानसभेत दिशा अ‍ॅक्ट 2019 साठी मंजूरी देण्यात आली आहे. गृहमंत्री मेकतोटी सूचरिता यांच्याकडून शुक्रवारी विधासनभेत दिशा अ‍ॅक्ट विधेयक मांडण्यात आले होते. त्यानुसार, महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात केवळ 21 दिवसांत खटला निकाली काढण्यात येणार आहे. तसेच, याप्रकरणी दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. पोलिसांनी सबळ पुरावे आणि साक्षी शोधून 7 दिवसांत तपास पूर्ण करावा, त्यानंतर 14 दिवसांत या खटल्याचं न्यायालयीन कामकाज पूर्ण व्हावं, असे या विधेयकात म्हटले आहे. सध्याच्या कायदयानुसार फास्टट्रॅक कोर्टात या गुन्ह्यातील खटला चालविण्यासाठी 4 महिन्यांचा अवधी देण्यात येतो. 

दरम्यान, आंध्र प्रदेश सरकारच्या या नवीन कायद्यानुसार राज्यातील 13 जिल्ह्यात विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणार आहे. याप्रकरणी गुन्ह्यातील गंभीता लक्षात घेऊन 10 वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा या कायद्यान्वये करण्यात येईल. दरम्यान, हैदराबाद दिशा गँगरेप आणि मर्डर प्रकरणातील पीडित कुटुंबीयांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे आभार मानले आहेत. या कायद्याला दिशा अ‍ॅक्ट नाव देण्यात आल्याने आणि देशातील महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने जगमोहन यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगत दीशाच्या वडिलांनी म्हटले. 

जगनमोहन रेड्डी यांनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरची प्रशंसा केली होती. तसेच तेलंगणा पोलिसांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. देशात काहींनी या एन्काऊंटरला विरोध केला होता, तर काहींनी पोलिसांच्या कृतींचं समर्थन केलं आहे. आंध्र प्रदेशच्या विधानसभेत चर्चेदरम्यान सीएम जगनमोहन रेड्डी, यांनी मी दोन मुलींचा बाप असल्याचंही सांगितलं. मला एक बहीण आहे आणि एक पत्नी आहे. जर माझ्या मुलींसोबत असं काही झालं असतं तर माझी काय प्रतिक्रिया असती?, मी कोणता न्याय मागितला असता?, असंही रेड्डींनी म्हटले होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारAndhra Pradeshआंध्र प्रदेशhyderabad caseहैदराबाद प्रकरण