मृत्यूच्या काही मिनिटे आधी क्रूझवर काय घडलं? 'तो' थरारक व्हिडिओ आला समोर; अंगावर नव्हतं जॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 18:04 IST2026-05-01T17:28:55+5:302026-05-01T18:04:28+5:30

जबलपूर क्रूझ दुर्घटनेआधीचा प्रवाशांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Jabalpur Tragedy Video Captured Minutes Before Cruise Capsize Reveals Safety Lapses | मृत्यूच्या काही मिनिटे आधी क्रूझवर काय घडलं? 'तो' थरारक व्हिडिओ आला समोर; अंगावर नव्हतं जॅकेट

मृत्यूच्या काही मिनिटे आधी क्रूझवर काय घडलं? 'तो' थरारक व्हिडिओ आला समोर; अंगावर नव्हतं जॅकेट

Jabalpur Cruise Accident:मध्य प्रदेशातील जबलपूर इथल्या बर्गी डॅममध्ये झालेल्या क्रूझ दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. आतापर्यंत ९ मृतदेह हाती लागले असून, या दुर्घटनेच्या काही मिनिटे आधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ३० एप्रिलच्या सायंकाळी, पर्यटकांनी भरलेली क्रूझ बोट बरगी धरणावर नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी निघाली होती. अचानक हवामानात बदल झाला आणि एक भीषण वादळ घोंघावत आले. या वादळासोबत ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. बघता बघता पाण्यात प्रचंड लाटा उसळल्या, ज्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच ती बोट उलटली आणि खोल पाण्यात बुडाली.

आता या भीषण अपघाताच्या काही वेळापूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे.  दुर्घटना घडण्यापूर्वी क्रूझवर पर्यटकांची मोठी गर्दी होती. क्रूझवर लहान मुले आणि वृद्ध महिलांसह अनेक प्रवासी होते, मात्र बहुतेकांनी लाईफ जॅकेट घातलेले नव्हते. व्हिडीओनुसार लोक प्रवासाचा आनंद घेत होते. मात्र काही वेळातच त्यांना मृत्यू गाठणार आहे याची कुणालाच कल्पना नव्हती.

 आकाशात ढग जमलेले असताना आणि सोसाट्याचा वारा सुटलेला असतानाही क्रूझ राइड सुरूच ठेवण्यात आली. अधिकृत माहितीनुसार, बाहेर काढण्यात आलेल्या ९ मृतांपैकी ८ जणांच्या अंगावर लाईफ जॅकेट नव्हते. जर सर्वांना जॅकेट दिले असते, तर कदाचित अनेकांचे प्राण वाचले असते.

आईच्या कुशीतच मुलाचा शेवट

या दुर्घटनेनंतर घटनास्थळावरून समोर आलेली एक दृश्य पाहून सर्वांचेच डोळे पाणावले. दिल्लीहून पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबाचा या दुर्घटनेत मोठा घात झाला आहे. या कुटुंबात पती, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी होती. अपघातावेळी पती आणि मुलगी सुदैवाने बचावले. मात्र, जेव्हा बचाव पथकाने शोधमोहीम राबवली, तेव्हा आई आणि मुलाचा मृतदेह सापडला. मुलाने आईला घट्ट मिठी मारलेली होती. ही दृश्ये पाहून मदतकार्यात सहभागी असलेल्या जवानांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.

दरम्यान, अद्यापही काही लोक बेपत्ता असून शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, जसा वेळ जात आहे, तशी बेपत्ता लोकांच्या जगण्याची शक्यता कमी झाली आहे.

Web Title : जबलपुर क्रूज हादसा: मौत से पहले का खौफनाक वीडियो आया सामने।

Web Summary : जबलपुर के बरगी बांध में क्रूज दुर्घटना में नौ लोगों की जान चली गई। एक वीडियो में तूफान से पहले पर्यटक सवारी का आनंद ले रहे हैं। कई लोगों ने लाइफ जैकेट नहीं पहनी थी। एक माँ और बच्चा मृत पाए गए, गले मिले हुए।

Web Title : Cruise tragedy: Chilling video surfaces before deadly Jabalpur accident.

Web Summary : A cruise accident in Jabalpur's Bargi Dam has claimed nine lives. A video shows tourists enjoying the ride moments before a storm capsized the boat. Many weren't wearing life jackets. A mother and child were found dead, embraced.