इस्लामिक स्टेटमध्ये गेलेल्या आझमगडमधल्या तरुणाला लागले घरवापसीचे वेध

By Admin | Updated: October 10, 2015 09:13 IST2015-10-10T09:13:16+5:302015-10-10T09:13:16+5:30

इस्लामिक स्टेटसाठी लढण्यासाठी सीरियामध्ये गेलेल्या २० वर्षांच्या आझमगडमधल्या मुलाला आता पुन्हा भारतात घरी परतण्याचे वेध लागले आहेत.

In the Islamic State, a group of youths who had gone to Azamgarh | इस्लामिक स्टेटमध्ये गेलेल्या आझमगडमधल्या तरुणाला लागले घरवापसीचे वेध

इस्लामिक स्टेटमध्ये गेलेल्या आझमगडमधल्या तरुणाला लागले घरवापसीचे वेध

>ऑनलाइन लोकमत
आझमगड, दि. १० - इस्लामिक स्टेटसाठी लढण्यासाठी सीरियामध्ये गेलेल्या २० वर्षांच्या आझमगडमधल्या मुलाला आता पुन्हा भारतात घरी परतण्याचे वेध लागले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्लामिक स्टेटकडे ओढला गेलेला हा तरूण सहा महिन्यांपूर्वी दुबईमार्गे आधी टर्कीला व मग सीरियामध्ये गेला खरा, परंतु सततच्या बाँबिंगमुळे जीवाला असलेला आणि इस्लामिक स्टेटकडून मिळालेल्या वागणुकीमुळे झालेला भ्रमनिरास यामुळे त्याचे डोळे उघडले आहेत. त्याने काही दिवासंपूर्वी पालकांना फोन केला आणि भारतात परतण्याची ईच्छा व्यक्त केली.
भारतीय सुरक्षा यंत्रणा या तरुणाला परत आणण्यासंदर्भात पुढाकार घेत असून त्याला कुणी नादाला लावले याचा छडा लावण्याचाही प्रयत्न करत आहेत. अरब अमिरातीमध्ये असलेल्या एका भारतीय तरुणाने आझमगडमधल्या या तरुणाला इस्लामिक स्टेटच्या संपर्कात आणल्याचा संशय आहे. 

Web Title: In the Islamic State, a group of youths who had gone to Azamgarh