शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

‘इसिस’चे प्राचारी ट्विट्स बंगळुरुमधून?

By admin | Updated: December 13, 2014 12:12 IST

‘इसिस’चे सर्वात यशस्वी ट्विटर अकाऊंट हाताळणारा बेंगळुरूचा मेहदी नावाचा इसम फरार झाल्याचा संशय असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती बेंगळुरू पोलिसांनी दिली आहे.

ब्रिटिश वृत्तवाहिनी : मेहदी नावाच्या इसमाचा शोध सुरु
बेंगळुरू  @ShamiWitness या नावाने ‘इसिस’चे सर्वात यशस्वी ट्विटर अकाऊंट हाताळणारा बेंगळुरूचा मेहदी नावाचा इसम फरार झाल्याचा संशय असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती बेंगळुरू पोलिसांनी दिली आहे. हे  ट्विटर अकाऊंट हाताळणारा इसम बेंगळुरूत राहात असल्याच्या ब्रिटिश मीडियाच्या वृत्ताचा गुन्हे शाखेमार्फत तपास प्रारंभ करण्यात आला आहे.
‘शुक्रवारी सकाळीच आम्हाला याबाबत माहिती मिळाली. या वृत्ताची सत्यासत्यता तपासण्याचे गुन्हे शाखेला सांगण्यात आले आहे. जसे तुम्हाला कळले तसेच मलाही कळले आहे. याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल,’ असे शहर पोलीस आयुक्त एम. एन. रेड्डी यांनी पत्रकारांना सांगितले. 
या संदर्भात आपण एनआयए आणि आयबी या केंद्रीय संस्थांच्या संपर्कात असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. ‘इसिस’चे ट्विटर अकाऊंट हाताळणारा इसम बेंगळुरूतील एका बहुराष्ट्रीय जाहिरात कंपनीत कार्यकारी अधिकारी आहे आणि तो मेहदी या नावाने ओळखला जातो. या ट्विटरचे 17,700 समर्थक आहेत, असे वृत्त ‘चॅनल 4’ या ब्रिटिश वृत्तवाहिनीने दिले आहे. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर  @ShamiWitness हे अकाऊंट बंद करण्यात आले आहे.
‘इसिस’चे अकाऊंट हाताळणारा मेहदी बेंगळुरूतून फरार झाला आहे आणि सायबर सेल त्याचा शोध घेत आहे, अशी माहिती एका पोलीस अधिका:याने दिली. हे ट्विटर अकाऊंट गेल्या वर्षी प्रसिद्ध झाले होते आणि त्यावर इसिसची माहिती व सिरिया व इराकमधील हल्ल्यांची छायाचित्रे पोस्ट करून युवकांना इसिसमध्ये भरतीचे आवाहन केले जात होते, असे ‘चॅनल 4’ने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)