नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या विजयावरून प्रसिद्ध वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर टीका केली.
बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना सिब्बल म्हणाले की, निवडणुकीत हार-जीत होत राहते. मात्र, संविधानाचा पराभव होऊ नये आणि लोकशाही पराभूत होऊ नये. जो जिंकला, तो सिकंदर असला तरी कोणत्या प्रकारे निवडणूक जिंकली, काय षड्यंत्र केले गेले? याबद्दल प्रश्न आहेत.
सिब्बल यांनी म्हटले की, भाजपने पश्चिम बंगालमध्ये विजय मिळविल्यानंतर पंतप्रधान म्हणाले की, आम्ही बदल्याची नव्हे तर बदलाची नीती अवलंबतो. हे त्यांचे वाक्य चांगले आहे. २०१४ पासून त्यांनी बदलाची नीती अवलंबलत आले की बदल्याची, हा माझा प्रश्न आहे. त्यांनी बदला घेण्याचे ठरवत सरकारे बदलली. जिथे बहुमताचे सरकार होते, तेथे तोड-फोड करून, आपल्या पक्षात त्यांना समाविष्ट करून सरकार स्थापन केले. ही बदल्याची नीती आहे की बदल्याची?
ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याबद्दल विचारले असता त्यांनी यावर उत्तर देण्यास नकार दिला. ते म्हणाले की, असे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचे काय विचार आहेत, हे कसे कळणार? त्यावर आपण कसे बोलणार? यावर मी न बोललेलेच बरे.
Web Summary : Kapil Sibal criticizes PM Modi, questioning if his policies since 2014 are of change or revenge, referencing government changes and alleged defections.
Web Summary : कपिल सिब्बल ने पीएम मोदी की आलोचना करते हुए सवाल किया कि 2014 से उनकी नीतियाँ बदलाव की हैं या बदले की? उन्होंने सरकार बदलने और कथित दलबदल का जिक्र किया।