इंदिरा गांधी यांना देशाने वाहिली श्रद्धांजली

By Admin | Updated: November 20, 2014 02:03 IST2014-11-20T02:03:26+5:302014-11-20T02:03:26+5:30

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त देशाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उ

Indira Gandhi wahily tribute to the country | इंदिरा गांधी यांना देशाने वाहिली श्रद्धांजली

इंदिरा गांधी यांना देशाने वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त देशाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. राजधानी नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शक्तिस्थळावर जाऊन आपली श्रद्धासुमने अर्पण केली.
याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह अनेकजण उपस्थित होते; मात्र विद्यमान सरकारतर्फे याप्रसंगी कोणीही उपस्थित नव्हते.
यावेळी श्रीमती गांधी यांच्या भाषणाची ध्वनिफीत ऐकविण्यात आली. त्यानंतर नेत्यांनी तीन रंगाचे फुगे आकाशात सोडले व सर्वधर्म प्रार्थनाही करण्यात आली.
तामिळनाडू प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष एम. कृष्णास्वामी, यू बालरमण, विजय इलंचेझियान, के. चिरंजीवी आदींनी पक्ष कार्यालयात इंदिरा गांधींना श्रद्धांजली वाहिली.
मोदींची टिष्ट्वटरवर श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना टिष्ट्वटरवर श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Indira Gandhi wahily tribute to the country