शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

भारतात पुन्हा हल्ल्याचा हाफिज सईदचा कट

By admin | Updated: November 8, 2016 03:07 IST

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा कट आखत आहे

नवी दिल्ली : मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा कट आखत आहे. हाफिज सईद आपल्या दहशतवाद्यांना जल मार्गाने भारतात घुसवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. लष्कर-ए-तोयबाचे ८ ते ९ दहशतवादी जम्मूमधील निक्की तावी आणि बडी तावी या नद्यांचा मार्गाने भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी सैन्य त्यांना मदत करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानमधील चेनाब नदी जम्मू भागात तावी नदीला मिळते. त्यामुळे आधी जम्मूमध्ये घुसून, भारतात हल्ले करण्याची योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. हाफिज सईदने या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू इरफान टांडेवालावर सोपवली आहे. हाफिजच्या या योजनेची माहिती मिळाल्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मूच्या निक्की तावी आणि बडी तावी नद्यांच्या आसपासच्या परिसरात तसेच त्या संपूर्ण भागात कडक बंदोबस्त ठेवला आहे. तेथील सुरक्षा व्यवस्थेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. सीमेवरून घुसण्यात अडचणी येत असल्याने आणि ते करताना अनेक अतिरेकी मारले जात असल्याने हाफिज सईदने या मार्गाने दहशतवादी पाठवण्याचे ठरविले असावे, असे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय सीमा तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सातत्याने गोळीबार करून, त्या काळात अतिरेकी भारतात घुसविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना आतापर्यंत यश आलेले नाही. (वृत्तसंस्था)