शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या १५ वर्षीय चिमुरडीने मिळवला पहिला TIME अवॉर्ड, बनली 'किड ऑफ द ईयर'

By manali.bagul | Published: December 04, 2020 5:16 PM

Trending News in Marathi: अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी प्रदूषण ते औषधांचं व्यसन आणि सायबर बुलींग अशा विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तिने काम केलं आहे.

टाईम मॅगजीनने पहिल्यांदाच एका लहान मुलीला पुरस्कार देऊन गौरवलं आहे. विशेष म्हणजे हा खास पुरस्कार मुळची भारतीय आणि अमेरिकेतील रहिवासी असलेल्या गीतांजली राव हिला मिळाला आहे. 202 च्या किड ऑफ द ईयर साठी या भारतीय वंशाच्या  मुलीची निवड करण्यात आली आहे. अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी प्रदूषण ते औषधांचं व्यसन आणि सायबर बुलींग अशा विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तिने काम केलं आहे. यासाठी‘टाईम्स’ने सन्मानाने तिचा गौरव केला आहे. गीतांजलीचे वय अवघे 15 वर्षे आहे. 

कोलोरॅडो येथिल रहिवासी असलेल्या गीतांजलीची 5 हजार नामांकनातून निवड झाली. हॉलीवूड अभिनेत्री अँजेलीना जोलीने तिची मुलाखत घेतली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक पातळीवर सामाजिक समस्यांवर कशी मात करता येईल याबाबत गीतांजलीचे प्रयत्न सुरू आहेत.  'टाईम'शी बोलताना गीतांजलीने दिलेल्या माहितीनुसार वयाच्या दहाव्या वर्षी तीने पहिल्यांदा आपल्या पालकांना कार्बन नॅनोट्यूब सेन्सर टेक्नोलॉजीवर (carbon nanotube sensor technology) ती संशोधन करत असल्याचं सांगितलं. ते ऐकून तिच्या आईला आश्चर्य वाटलं.  वयाच्या अकराव्या वर्षी गीतांजलीने ‘डिस्कव्हरी एज्यूकेशन 3 एम सायंटिस्ट चॅलेंज’ ही स्पर्धा जिंकली. तिच्या संशोधनासाठी फोर्ब्सच्या (Forbes)30 वर्षांच्या आतील 30 जणांच्या यादीत तिचा (30 Under 30) समावेश झाला होता.

काय सांगता राव! पोरीने ऑनलाईन जेवण मागवलं, ४२ डिलिव्हरी बॉईज जेवण घेऊन पोहोचले, मग....

सायबर बुलिंग थांबवण्यासाठी करण्यात आलेल्या संशोधनाबाबत बोलताना तिने सांगितले की, ''हे एका सेवेप्रमाणे आहे. या  कार्यप्रणालीचे नाव Kindly आहे. हे एक अॅप आणि क्रोम एक्सटेंशन आहे. ज्याद्वारे सुरूवातीलाच सायबर बुलिंगला पकडलं जाऊ शकतं. यासाठी आर्टिफिशिलय इंटेलिजेंस टेक्नोलॉजीची मदत घेतली जाऊ शकते. ही कार्यप्रणाली तयार करून जगाच्या समस्या सोडवण्याचा माझा उद्देश आहेच पण इतरांनाही असं करण्यासाठी मला प्रेरित  करायचे आहे. ''

लय भारी! ऑस्ट्रेलियन मुलीला प्रपोज करणाऱ्या भारतीयाने सांगितली Love Story, आधी फेसबूकवर शोधलं मग....

गीतांजली आता वेदनाशामक औषधांचं व्यसन शोधून काढून म्यु-ओपाईड रिसेप्टर जनुकाद्वारे (mu-opioid receptor gene)होणाऱ्या प्रोटीन उत्पादनावर आधारीत हे संशोधन करत आहे. 2018 मध्ये तिने अमेरिकेतील मानाचा, पर्यावरण संरक्षण संस्था प्रेसिडेंट एन्व्हायर्नमेंटल युथ पुरस्कार (President’s Environmental Youth Award) मिळवला होता. जेनेटीक्सची प्रचंड आवड असलेल्या गीतांजलीला एमआयटीमधून (MIT) जेनेटीक्स आणि साथीचे रोग या विषयात शिक्षण घेण्याची इच्छा आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीJara hatkeजरा हटके