Ind vs aus indian man proposed australian girlfriend and then share love story on Instagram | लय भारी! ऑस्ट्रेलियन मुलीला प्रपोज करणाऱ्या भारतीयाने सांगितली Love Story, आधी फेसबूकवर शोधलं मग....

लय भारी! ऑस्ट्रेलियन मुलीला प्रपोज करणाऱ्या भारतीयाने सांगितली Love Story, आधी फेसबूकवर शोधलं मग....

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन डे सामान्यात भारताला पुन्हा पराभव पत्करावा लागला असून ऑस्ट्रेलियाची विजयी आघाडी पाहायला मिळाली. पण  भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही मॅच  अविस्मरणीय ठरली. मेलबर्न (Melbourne) चा रहिवासी असलेल्या दिपेन मनडालिया या तरूणाने मॅच सुरू असताना आपली प्रेयसी विंबुश (Rose Wimbush) हिला प्रपोज केले. या दोघांची प्रेमकहाणी दोन वर्षांपूर्वी सुरू झाली होती.

सामना सुरू असतातना दिपकने रोज विंबुशला प्रपोज केल्यानंतर सोशल मीडियावर या दोघांचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. क्रिकेटच्या चाहत्यांनी या दोघांच्या फोटोला खूप पसंती दिली. त्यानंतर इंस्टाग्रामवर या दोघांनी आपली लवस्टोरी सगळ्यांशी शेअर केली आहे. ते दोघे एकमेकांना रोज कसे भेटले याबाबतही खुलासा केला आहे.

दिपेन मनडालिया यांनी तीन फोटो पोस्ट करत सांगितले आहे की, ''तु माझ्या आयुष्यात रंग भरले आहेस. दोन वर्षांपूर्वी मी मेलबर्नला शिफ्ट झालो. त्यानंतर मी एक लहानश्या अपार्टमेंटमध्ये घर घेतलं. याच गोष्टीने माझे संपूर्ण आयुष्य बदलले. त्या घरात माझ्या आधी एक महिला भाडेकरू राहत होती. तिचे नाव विंबुश होते.  मला त्यांची काही पत्रं मिळाली. त्यानंतर मी त्यांचा शोध सुरू केला. रोज फेसबूकवर सर्च करत होतो. त्यानंतर अखेर आमची भेट झाली. आम्ही सगळ्यात आधी कॉफी पिण्यासाठी गेलो त्यानंतर डिनरसाठीही गेलो. ''

काय सांगता राव! पोरीने ऑनलाईन जेवण मागवलं, ४२ डिलिव्हरी बॉईज जेवण घेऊन पोहोचले, मग....

रोज पश्चिमी सिडनीमधील रहिवासी असून मेलबर्नमध्ये आरोग्य आणि सुव्यवस्थेसाठी स्वयंसेवकाप्रमाणे काम करते. दिपेन आणि रोज  हो दोघे क्रिकेटचे फॅन आहेत. दीपेनला भारतीय संघ आवडत असून रोजची आॉस्ट्रेलियाच्या संघाला पसंती आहे. 

जबरदस्त! साडीवाल्या बाईचा 'हा' स्टंट पाहून भल्याभल्याची उडालीये झोप; पाहा व्हायरल व्हिडीओ

दिपेनने पुढे सांगितले की, ''जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा क्रिकेटबद्दलच चर्चा करत होतो. माझ्या मनात आलं प्रपोज करण्याची हीच योग्यवेळ आहे. म्हणून मी लाईव्ह सामना सुरू असतानाच प्रपोज केलं आणि इंटरनेटवर फोटो व्हायरल झाले.''  जेव्हा टीम इंडिया धावांसाठी प्रयत्न करत होती. तेव्हा कॅमेरामनने गर्दीवर कॅमेरा फिरवला. मग एका भारतीय मुलाने ऑस्ट्रेलियन मुलीला प्रपोज केले.  जेव्हा मुलगी हो म्हणाली तेव्हा ग्लेन मॅक्सवेलने टाळ्या वाजवल्या. दिपेनने रोजला मिठी मारली आणि आनंद व्यक्त केला. सामना गमावल्यानंतरही भारतीयांनी याला घटनेला सर्वात मोठा विजय म्हटले.

Web Title: Ind vs aus indian man proposed australian girlfriend and then share love story on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.