जबरदस्त! साडीवाल्या बाईचा 'हा' स्टंट पाहून भल्याभल्याची उडालीये झोप; पाहा व्हायरल व्हिडीओ

By Manali.bagul | Published: December 3, 2020 02:44 PM2020-12-03T14:44:11+5:302020-12-03T14:47:48+5:30

Viral Video in Marathi : हा व्हिडीओ रातोरात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Girl backflip in saree video is going viral twitter shocked after seen her | जबरदस्त! साडीवाल्या बाईचा 'हा' स्टंट पाहून भल्याभल्याची उडालीये झोप; पाहा व्हायरल व्हिडीओ

जबरदस्त! साडीवाल्या बाईचा 'हा' स्टंट पाहून भल्याभल्याची उडालीये झोप; पाहा व्हायरल व्हिडीओ

googlenewsNext

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या स्टंट्सचे, डान्स प्रकाराचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.  पण साडीवर कोणताही स्टंट करणं हे कठीण असतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला  लाल साडीमध्ये बॅक फ्लिप मारत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर युजर आकाश रानिसनने शेअर केला आहे. हा व्हिडीओ रातोरात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की महिला जमिनीवर साडी घालून बॅकफ्लिप मारत आहे.

या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, महिला सगळं काही करू शकतात जे पुरूष करू शकतात. इतकंच नाही पुरूषांपेक्षा अधिक चांगले करू शकतात. इंटरनेटवर हा व्हिडीओ रेकॉर्ड तोड व्हायरल होत आहे. या महिलेला काहीजणांना टँलेंटचे पावरहाऊस असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ २० नोव्हेंबरला  इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला होता.

काय सांगता राव! पोरीने ऑनलाईन जेवण मागवलं, ४२ डिलिव्हरी बॉईज जेवण घेऊन पोहोचले, मग....

आतापर्यंत १० लाखांपेक्षा  जास्त लोकांनी व्हिडीओ पाहिला असून सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. सोशल मीडिया युजर्सकडून या महिलेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ही महिला इंटरनॅशनल गोल्ड मॅडेलिस्ट असल्याची माहिती मिळत असून आपल्या इन्स्टाग्रामवर नेहमीच ही महिला एक्टिव्ह असते.  इंस्टाग्रामवर या महिलेचे १३ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. याआधी सुद्धा एका  साडी वर स्टंट्स करत असलेल्या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. भारीच! समोर आले जगातील सगळ्यात वयस्कर कासवाचे फोटो, पाहा १८८ वर्षांचा कासव

Web Title: Girl backflip in saree video is going viral twitter shocked after seen her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.