शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जीडीपी ४.५ टक्क्यांनी घसरण्याची शक्यता; डून अ‍ॅण्ड ब्राडस्ट्रीटचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 06:52 IST

डून अ‍ॅण्ड ब्राडस्ट्रीटच्या जागतिक अहवालात जगभरातील विविध देशांच्या चालू आर्थिक वर्षातील वाढीसंबंधात अंदाज वर्तविण्यात आले आहेत. त्यामध्ये भारताबाबतही वरील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई : कोरोनाच्या प्रकोपाने जगातील सर्वच देशांना ग्रासले असताना भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये (जीडीपी) चालू आर्थिक वर्षात ४.५ टक्क्यांनी घसरण होण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरी पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था भरारी घेऊन ६.३ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवू शकते.डून अ‍ॅण्ड ब्राडस्ट्रीटच्या जागतिक अहवालात जगभरातील विविध देशांच्या चालू आर्थिक वर्षातील वाढीसंबंधात अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यामध्ये भारताबाबतही वरील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या न भुतो भविष्यती लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. डून अ‍ॅण्ड ब्राडस्ट्रीटचे जागतिक मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. अरुण सिंग यांनी सांगितले की, भारतातील आर्थिक व्यवहार तीन टप्प्यांमध्ये खुले करण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी अद्यापही कंटेन्मेंट झोन असल्यामुळे तेथील लॉकडाऊन सुरूच आहे. यामुळे देशातील उत्पादक आणि पुरवठादार यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचा फटका एकूणच अर्थव्यवस्थेला बसत आहे. याबरोबरच देशातील वाढती महागाई, कमी झालेला रोजगार व वाढत असलेली बेरोजगारी यामुळे अर्थव्यवस्थेसमोर नवनवीन संकटे उभी ठाकत आहेत. या सर्व घटकांचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्था संकोचण्यामध्ये होणार असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.देशातील सद्यस्थितीचा परिणाम भारतीय रिझर्व्ह बँक तसेच सरकारच्या धोरणावरही होणार असून, त्यांना आपल्या धोरणामध्ये काही बदल करणे अपरिहार्य ठरण्याची शक्यता सिंग यांनी व्यक्त केली आहे.जगभरातील विविध देशांमध्ये कोरोनानंतर असलेल्या स्थितीबाबतही अहवालात भाष्य करण्यात आले आहे. या अहवालात भारत, चीन, जपान व सिंगापूर यापैकी एकाही आशियाई देशाचे रेटिंग बदलण्यात आलेली नाही. याचाच अर्थ आशियातील देशांवर कोरोनाचा कोणताच परिणाम झालेला दिसून येणारा नाही. आशियाई देश पुढील आर्थिक वर्षात पुन्हा विकासाच्या मार्गावर येतील, असे मत या अहवालात आहे.जगभरातील ११ देशांच्या रेटिंगमध्ये या अहवालात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये अल्बानिया, बोस्निया व हर्जेगोविना, क्रोएशिया, सायप्रस, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, हंगेरी, रोमानिया, स्लोवाकिया, स्पेन आणि उरुग्वे या देशांचा समावेश आहे. या ११ ही देशांचा रेटिंगमध्ये या अहवालात वाढ करण्यात आली आहे.आगामी वर्षाबाबत आशादायक स्थितीचालू आर्थिक वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये घसरण होणार असली तरी आगामी वर्षात ती पुन्हा भरारी घेण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. पुढील वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ६.३ टक्के राहण्याची शक्यता या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आली आहे.याशिवाय जगातील अन्य प्रमुख अर्थव्यवस्थांमध्येही या आर्थिक वर्षात घसरण होण्याची शक्यता या अहवालामध्ये व्यक्त केली गेली आहे. यामध्ये अमेरिका (५.३ टक्के घसरण), जपान (५.६ टक्के घसरण) यांचा समावेश आहे. मात्र जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनला चालू आर्थिक वर्षात २ टक्के वाढीचा लाभ मिळणार असल्याचे अहवाल स्पष्ट करतो.सन २०२१-२२ या आगामी आर्थिक वर्षात अन्य अर्थव्यवस्थांमध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये अमेरिका (२.९ टक्के वाढ), चीन (५.५ टक्के वाढ) आणि जपान (१.३ टक्के वाढ) या देशांमध्ये वरील प्रमाणे वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Economyअर्थव्यवस्था