शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: 'ते' दोन तास महत्त्वाचे ठरले; अजित डोवालांनी लडाखमध्ये चीनला झुकवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 15:34 IST

पंतप्रधान मोदींचे खास असलेल्या अजित डोवालांची रणनीती यशस्वी

नवी दिल्ली: लडाखमध्ये दोन महिन्यांपासून निर्माण झालेला तणाव निवळला आहे. चिनी सैन्य गलवानमधून २ किलोमीटर मागे गेलं आहे. चीन सरकारकडूनदेखील या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. पूर्व लडाखमधील अनेक पोस्टवरून चिनी सैन्यानं माघार घेतली असून भारतीय जवान परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून निर्माण झालेला तणाव कमी करण्यात सरकारला यश आल्याचं चित्र आहे. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू मानले जाणाऱ्या अजित डोवाल यांनी काल त्यांचे चिनी समकक्ष असलेल्या वांग यी यांच्यासोबत जवळपास दोन तास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. या दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर आज चिनी सैन्य दोन किलोमीटरपर्यंत मागे सरकलं. त्यामुळे डोवाल आणि वांग यी यांच्यातील चर्चा फलद्रूप ठरल्याचं म्हटलं जात आहे. डोवाल आणि वांग यी यांच्यातील चर्चा अतिशय सौहार्दपूर्ण होती, अशी माहिती सुत्रांनी दिली. भविष्यात पुन्हा गलवानसारखी घटना होऊ नये यासाठी शांतता राखण्याबद्दल दोघांनी चर्चा केली. या चर्चेचा परिणाम आज दिसला. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यात १५ जूनला रक्तरंजित झटापट झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचे ४० जवान मारले गेले. मात्र चीननं याबद्दलचा अधिकृत आकडा जाहीर केला नाही. रक्तरंजित संघर्षामुळे सीमेवरील तणाव आणखी वाढला. याच पार्श्वभूमीवर डोवाल यांनी वांग यी यांच्यासोबत काल चर्चा केली. त्यानंतर चीननं गलवान खोऱ्यातून सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याआधी दोन्ही देशांमध्ये अनेकदा कमांडर दर्जाच्या बैठका झाल्या.गेल्या काही दिवसांत भारतानं चीनला अतिशय आक्रमकपणे प्रत्युत्तर दिलं. सामरिक, आर्थिक आणि कूटनीती अशा सर्व आघाड्यांवर भारतानं आक्रमक पवित्रा घेतला. लडाखमधील सीमेवर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला. खुद्द पंतप्रधान मोदींनी लेहला भेट दिली. याशिवाय चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घालत ड्रॅगनला दणका दिला. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससारख्या देशांना भारताला पाठिंबा दिल्यानं चीनची कोंडी झाली. हा सर्व दबाव अखेर कामी आला.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीनAjit Dovalअजित डोवालNarendra Modiनरेंद्र मोदी