शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

भारत मुस्लिमांसाठी सर्वोत्तम देश; सुफी स्कॉलरनं काढले पाकिस्तानी नेत्यांचे वाभाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 16:29 IST

कलम ३७० वरुन पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांचा समाचार

नवी दिल्ली: कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर काश्मीरमधील विविध समुदायांची भेट देणाऱ्या सुफी शिष्टमंडळानं पाकिस्तानचे वाभाडे काढले आहेत. कलम ३७० रद्द केल्यामुळे जळफळाट झालेल्या पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी जिहादचा नारा दिला होता. यावर भाष्य करताना सुफी शिष्टमंडळातील मुस्लिम विद्वानांनी खान यांच्यावर तोफ डागली आहे. पाकिस्तानच्या चुकीच्या प्रचारामुळेच दोन देशांमध्ये युद्धसदृश्य स्थिती निर्माण होत असल्याचं शिष्टमंडळानं म्हटलं आहे. मुस्लिम विद्वानांनी काश्मीर भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. 'भारत मुस्लिमांसाठी सर्वोत्तम देश आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी घेतलेली जिहादी भूमिका अतिशय लज्जास्पद आहे. पाकिस्तानला युद्धाची इतकीच खुमखुमी असेल, तर त्यांनी पॅलेस्टाईन किंवा चीनमध्ये जावं. आम्हाला त्यांची सल्ल्याची गरज नाही,' अशा शब्दांमध्ये नसीरुद्दीन चिश्तींनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. जिहादच्या नावाखाली सीमेपलीकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाला बळी पडू नका, असं आवाहन चिश्तींनी काश्मिरींना केलं. 'काश्मिरातील परिस्थितीचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. मात्र पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या खोट्या प्रचारामुळे दोन देशांमधील परिस्थिती चिघळली आहे. यातील एका बाजूला विकास आणि भरभराट आहे आणि दुसऱ्या बाजूला अमानवता आहे,' असं चिश्ती म्हणाले.  

टॅग्स :Article 370कलम 370Imran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीर