शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
8
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
9
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
10
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
11
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
12
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
13
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
14
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
15
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
16
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
17
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
18
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
19
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
20
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचा चीनवर 'थंडगार' स्ट्राईक; 'या' वस्तूची आयात रोखण्याचा निर्णय

By कुणाल गवाणकर | Updated: October 16, 2020 09:14 IST

india bans import of air conditioners with refrigerants: आत्मनिर्भर भारतला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारचं पाऊल

नवी दिल्ली: मोदी सरकारनं रेफ्रिजरेंट असलेल्या एअर कंडिशनरच्या आयातीवर बंदी घातली आहे. देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अंतर्गत अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून एसींची आयात रोखण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. रेफ्रिजरेंट असलेल्या एअर कंडिशनरची आयात रोखण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती व्यापार संचलनालयानं एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून दिली. रेफ्रिजरेंट असलेल्या एअर कंडिशनरच्या आयातीचं धोरण 'मुक्त'वरून 'प्रतिबंधित' करण्यात आल्याची माहिती संचलनालयानं दिली आहे. व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं अत्यावश्यक नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयात धोरणाचा आढावा घेतला. त्यानंतर एसीची आयात रोखण्याचा निर्णय घेण्यात आला.विविध क्षेत्रांमध्ये पूर्णपणे स्वावलंबी होण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत अभियानावर भाष्य करताना जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एसीच्या आयातीचा विशेष उल्लेख केला. 'एसी उत्पादनात स्वावलंबी होण्याची गरज आहे. आपण आपल्या एकूण मागणीच्या ३० टक्क्यांहून एसी आयात करतो. आपल्याला हे प्रमाण वेगानं कमी करायला हवं,' असं मोदी म्हणाले होते.अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची आयात कमी करण्याचे प्रयत्न सरकारकडून सातत्यानं सुरू आहेत. जूनमध्ये सरकारनं कार, बस, ट्रक आणि दुचाकींमध्ये वापरले जाणारे न्यूमॅटिक टायरची आयात रोखण्याचा निर्णय घेतला. याआधी सरकारनं टीव्हीपासून संरक्षण सामग्रीपर्यंतची आयात थांबवण्याचे निर्णय घेतले आहेत.चीनला मोठा धक्काभारत एसींची सर्वाधिक आयात चीन आणि थायलंडमधून करतो. भारताच्या एकूण आयातीच्या ९० टक्के आयात या दोन देशांमधून होते. त्यामुळे एसीच्या आयातीवर घातलेली बंदी चीनसाठी धक्का मानला जात आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन