शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर-अंबड लिंकरोडवर गुन्हेगारीत वाढ अवैधधंदे तेजीत : पोलीस चौकीची मागणी

By admin | Updated: September 19, 2016 00:03 IST

सिडको : सातपूर - अंबड लिंकरोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाली असून, अवैधधंदेदेखील वाढले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या नागरिकांच्या सुरक्षेसाठी याठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या वतीने पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.

सिडको : सातपूर - अंबड लिंकरोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत वाढ झाली असून, अवैधधंदेदेखील वाढले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, या नागरिकांच्या सुरक्षेसाठी याठिकाणी पोलीस चौकी उभारण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या वतीने पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.सातपूर - अंबड लिंकरोड परिसरातील केवल पार्क येथे पोलीस चौकी उभारून चोवीस तास पोलीस कर्मचार्‍यांचीही नेमणूक करावी या मागणीसाठी शिवसेनेचे महानगर समन्वयक दिलीप दातीर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपआयुक्त विजय पाटील यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून केवल पार्क, अष्टविनायकनगर, लक्ष्मण टाउनशिप या परिसरात भंगार बाजारातील टवाळखोरांकडून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील उद्यानात तसेच मोकळ्या जागेत मद्यपान, मारामार्‍या करणे, तसेच त्यांच्याकडील असणार्‍या गावठी बंदुकांचा धाक देणे, तलवार, कोयते, लोखंडी रॉड अशा प्रकारच्या हत्यारांचा सर्रास वापर करणे, रस्त्याने ये-जा करणार्‍यांना शिवीगाळ करण्याबरोबरच महिला व मुलींची छेड काढण्याचे प्रकारही घडत असल्याने परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच भागात गेल्या अनेक वर्षांपासून असलेला अनधिकृत भंगार बाजारामुळेच याठिकाणी गुन्हेगारीचे प्रकार घडत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. पोलीस उपआयुक्तांना निवेदन देताना दिलीप दातीर, पंकज दातीर, गोरख घाटोळ, गोरख काळोगे, गिरीश ठाकरे, सागर जाधव, सिद्धेश घुमरे, विकास पाटील, रोहित खैरनार, यशवंत पवार, ज्ञानेश्वर काळे, किरण निगळ, योगेश जाधव, दीपक फडोळ, धनंजय निगळ, आकाश खर्जुल आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)सातपूर - अंबड लिंकरोड परिसरात असलेल्या अनधिकृत भंगार बाजारामुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे. येथील गुन्हेगार सर्रासपणे धारदार शस्त्रांचा तसेच बंदुकीचा धाक दाखवित असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर अवैधधंद्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढतच असल्याने याठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने भंगार बाजार हटविण्याबरोबरच याठिकाणी त्वरित पोलीस चौकी उभारणे गरजेचे आहे.दिलीप दातीर, महानगर समन्वयक, शिवसेना