शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यासमोरच मुलाने आईला पेट्रोल टाकून जिवंत जाळले, मग बनवला व्हिडीओ  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 20:10 IST

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे अका तरुणाने पोलीस ठाण्यासमोरच आईवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये सदर महिला ४० टक्के भाजली आहे.

उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे अका तरुणाने पोलीस ठाण्यासमोरच आईवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमध्ये सदर महिला ४० टक्के भाजली आहे. सुमारे पाच मिनिटे आगीत होरपळल्यानंतर घटनास्थळावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी माती आणि पाणी टाकून ही आग शमवली. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या या महिलेला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल  करण्यात आले. मात्र तिची गंभीर अवस्था पाहता तिला जेएन मेडियल कॉलेज सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये पीडित महिला पोलीस ठाण्यातून बाहेर येताना दिसत आहे. तर तिच्या मागून तिची मुलगा धावत येताना दिसत आहे. त्यानंतर तो पेट्रोलची बाटली काढून आईवर पेट्रोल टाकून तिला आग लावताना दिसत आहे. त्यादरम्यान घटनास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यानंतर लोक इकडून तिकडे पळताना दिसत आहेत. तसेच काही पोलीस ही आग शमवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

या घटनेबाबत डीएसपी राजीव द्विवेदी यांनी सांगितले की, या महिलेने तिच्या नातेवाईकांविरोधात विविध तक्रारी पोलिसांकडे दिल्या होत्या. त्याबाबत चौकशीसाठी तिला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. याचदरम्यान, अचानक तिच्या मुलाने तिच्यावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. पीडितेला रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशFamilyपरिवार