शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
4
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
5
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
6
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
7
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
8
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
9
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
10
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
11
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
12
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
13
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
14
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
15
Baramati Election Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
16
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
17
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
18
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
19
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
20
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
Daily Top 2Weekly Top 5

शपथविधीसाठी अभेद्य सुरक्षा व्यवस्था

By admin | Updated: May 25, 2014 03:59 IST

येत्या सोमवारी नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रपती भवनातील शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षेचा अभूतपूर्व बंदोबस्त करण्यात आला आहे़

नवी दिल्ली : येत्या सोमवारी नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रपती भवनातील शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षेचा अभूतपूर्व बंदोबस्त करण्यात आला आहे़ या दिवशी राष्ट्रपती भवन आणि परिसरात जमिनीपासून आकाशापर्यंत अभेद्य सुरक्षा कडे उभारले जाईल़ गणराज्य दिनाच्या परेडदरम्यान होणार्‍या सुरक्षेच्या धर्तीवर यावेळी सर्वत्र बंदोबस्त ठेवला जाईल़ रायसिना हिल्सस्थित राष्ट्रपती भवनातील मोदींच्या शपथविधी सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हामीद करझई, श्रीलंकन अध्यक्ष महिन्द्रा राजपाक्षे यांच्यासह देश-विदेशातील अनेक अतिविशिष्ट व्यक्ती हजर राहणार आहेत़ त्यामुळे राष्ट्रपती भवनाभोवती अनेकस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे़ सोहळ्यादरम्यान वायुदलाची सुरक्षा तैनात केली जाईल़ शपथविधी सोहळा संपेपर्यंत राष्ट्रपती भवनाच्या वर आकाशात उड्डाणास बंदी (नो फ्लार्इंग झोन)असेल़ सोहळ्यापूर्वी अनेकदा संपूर्ण परिसराचे हवाई सर्वेक्षण केले जाईल़ एका सुरक्षा अधिकार्‍याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्कतेने काम करता यावे, यासाठी सरकारी कार्यालयांना दुपारी १ नंतर सुटी देण्यात येईल़ या संपूर्ण सोहळ्यासाठी पाच हजारपेक्षा अधिक सुरक्षा जवान तैनात करण्यात येतील़ राष्ट्रपती भवनावरील आकाशात या काळात ‘नो फ्लार्इंंग झोन असेल’़ रडारवरून यावर नजर ठेवली जाईल़ हवाई धोक्यांपासून निपटण्यासाठी आजूबाजूंच्या इमारतींवर वायुदलाचे निशानेबाज तैनात राहतील़ दिल्ली पोलीस, निमलष्करी दल, ब्लॅक कॅट कमांडोंचा या ठिकाणी कडक पहारा असेल़ सरकारी सूत्रानुसार, मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांसह सुमारे तीन हजार निमंत्रित उपस्थित राहण्याची शक्यता आहे़ दिल्ली पोलिसांवर गणमान्य अतिथींच्या सुरक्षेचा जिम्मा राहील़ नवाज शरिफ, हामीद करझई आणि राजपाक्षे यांना सर्वोच्च सुरक्षा पुरवली जाईल़ स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, आत येण्याची आणि बाहेर जाण्याची विशिष्ट व्यवस्था केली जाईल़ (लोकमत न्यूज नेटवर्क)