शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

Coronavirus: CBSE पाठोपाठ ICSE बोर्डाच्याही दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 11:53 AM

सीबीएससी पाठोपाठ आयसीएसई बोर्डानेही दहावी आणि बारावीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसीबीएसई पाठोपाठ आयसीएसईनेही ३१ मार्चपर्यंत पुढे ढकल्या दाहावी, बारावीच्या परीक्षा ​​​​​​​सीबीएसई 31 मार्चनंतर घेणार 10,12वीच्या परीक्षा​​​​​​​भारतातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 169 वर

नवी दिल्ली - संपूर्ण देशात कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. यापार्श्वभूमीवर आता सीबीएसई पाठोपाठ आयसीएसई बोर्डानेही दहावी आणि बारावीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सीआयएससीईचे मुख्य कार्यकारी अधिकारी गेरी अराथून यांनी ही माहिती दिली.

संपूर्ण देशात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून बुधवारी सीबीएसई बोर्डानेही सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे उर्वरित पेपर 31 मार्च नंतर घेण्याचे जाहीर केले आहे. मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाच्या आदेशानंतर सीबीएसईने हा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे भारतात आतापर्यंत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 169 वर पोहोचला आहे. दिल्लीपासून केरळपर्यंत पसरलेल्या या व्हायरसने पश्चिम बंगालमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. 

चीन, इटली, अमेरिका, इराण, स्पेन आदी देशांत कोरोनाचा कहर सुरू असताना भारतातील परिस्थिती मात्र बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. त्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनेही समाधान व्यक्त केले आहे. सध्या भारतात दुसऱ्या टप्प्यात कोरोना आहे. म्हणजेच कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या देशातून ज्या व्यक्ती भारतात आल्या आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 

कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांना त्याचा संसर्ग होतो. सध्या भारतात बाहेरून आलेल्या लोकांना कोरोना झाला आहे. मात्र याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.   

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याexamपरीक्षाStudentविद्यार्थीSchoolशाळाTeacherशिक्षकCBSE Examसीबीएसई परीक्षाdelhiदिल्ली