शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

IAS Athar Aamir Khan Wedding: टीना डाबींनंतर त्यांच्या एक्स नवऱ्यानेही केले दुसरीशी लग्न; नववधूने घातल्या तीन अटी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 18:50 IST

अतहर खान यांनी दोन महिन्यांपूर्वी डॉ. महरीन काझी हिच्याशी साखरपूडा केला होता. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला आहे.

आयएएस अधिकारी टीना डाबी आणि अतहर अमिर खान या दोघांच्या जोडीने घटस्फोटानंतर आपापले जिवनसाथी निवडले आहेत. टीना यांनी आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्याशी काही महिन्यांपूर्वीच लग्न केले, तर अतहर यांचेही आज लग्न झाले आहे.

अतहर खान यांनी दोन महिन्यांपूर्वी डॉ. महरीन काझी हिच्याशी साखरपूडा केला होता. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आला आहे. यामध्ये अतहर एका काँट्रॅक्टवर सही करताना दिसत आहेत. त्यांचा साखरपूडा जुलैमध्ये झाला होता. आयएएस अतहर त्याची होणारी पत्नी मेहरीनसोबत सोफ्यावर बसला आहे. एक मुलगी त्यांच्यासमोर 'एंगेजमेंट कॉन्ट्रॅक्ट' ठेवते. हे पाहून अतहरने खरोखरच सही करायची आहे का, असा सवाल केला. यावेळी उपस्थित लोक हसले.

काय आहेत या अटी...
१- अतहरला प्रत्येक वेळी मेहरीनच बरोबर असल्याचे मान्य करावे लागेल.
2- वर्षातून 2-3 वेळा मेहरीनला परदेशात फिरण्यासाठी घेऊन जावे लागेल.
3- महरीन जे काही मागेल, ते कुठेही असले तरी ते खरेदी करून द्यावे लागेल. 

UPSC चा 2015 दुसरा टॉपर आणि IAS अतहर आमिर खान यांचे आज दुसरे लग्न झाले. टीना डाबी यांच्याशी त्यांचे पहिले लग्न झाले होते. लग्नाच्या फोटोग्राफरने याला दुजोरा दिला आहे. हा विवाह श्रीनगरमध्ये होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 30 सप्टेंबरला मेहंदी सोहळा पार पडला. आयएएस अतहरच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मेहरीन मेहंदी लावताना दिसत आहे. त्यांच्या लग्नाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. युजर्स त्यांच्या लग्नाबद्दल त्यांना शुभेच्छा देत आहेत.
 

टॅग्स :marriageलग्न