शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'गौरी लंकेश यांच्यावर मीच गोळ्या झाडल्या'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 03:45 IST

ज्येष्ठ कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या मीच केली होती, मी त्यांच्यावर ५ सप्टेंबर २0१७ रोजी चार गोळ्या झाडल्या, अशी कबुली परशुराम वाघमारे यांनी पोलिसांना दिली.

बंगळुरू : ज्येष्ठ कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या मीच केली होती, मी त्यांच्यावर ५ सप्टेंबर २0१७ रोजी चार गोळ्या झाडल्या, अशी कबुली परशुराम वाघमारे यांनी पोलिसांना दिली. धर्मरक्षणासाठी एकाची हत्या करायची आहे, असे मला मे २०१७ मध्ये सांगण्यात आले होते. त्याला मी तयार झालो. मात्र ज्या व्यक्तीस मारायचे आहे, तिच्याविषयी मला माहिती नव्हती, असे वाघमारेने म्हटले आहे. या प्रकरणी चौकशीसाठी श्रीराम सेनचा जिल्हाध्यक्ष राकेश मठ याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे.
वाघमारेने पालिसांना सांगितले की, मला ३ सप्टेंबर रोजी बंगळुरू येथे नेण्यात आले. त्याआधी बेळगावात एअरगनचे प्रशिक्षण दिले. हत्येआधी तीनदा वेगवेगळ्या तिघांनी मला गौरी लंकेश यांच्या घराच्या परिसरात नेले होते. ते तिघे कोण होते, ते मात्र मला माहीत नाही. मला ३ सप्टेंबर रोजी गौरी लंकेश यांचे बंगळुरूच्या आर. आर. नगरमधील घर दाखवण्यात आले. दुसऱ्या दिवशीच गौरी लंकेश यांची हत्या करण्याचे ठरले होते. मात्र आम्हाला पोहोचायला उशीर झाला. त्यामुळे आम्ही परत आलो.
तिसºया दिवशी म्हणजे ५ सप्टेंबर रोजी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास बंदुक देण्यात आली. मला एकाने दुचाकीवरून गौरी लंकेश यांच्या घरापर्यंत नेले. आम्ही तिथे वेळेत पोहोचलो. त्या कारमधून उतरण्याआधी मी त्यांच्या कारपाशी पोहोचलो. तिथे मी खाकरताच, त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्याबरोबर मी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, असा जबाब वाघमारेने दिला आहे. गोळ्या झाडल्यानंतर मी व इसम लगेच बाइकवरून निघालो. त्याच रात्री मी बंगळरू शहर सोडून बाहेर निघालो, असेही त्याने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
>या संघटनांशी संबंधित
पोलिसांनी या प्रकरणात सनातन संस्था वा हिंदू जनजागृती समिती यांची थेट नावे घेतलेली नाहीत. मात्र आतापर्यंत ज्यांना अटक करण्यात आली वा ज्यांनी जबाब दिला आहे, ते सारे या संस्थांशी संबंधित आहेत. त्यांच्यापैकी काहींचा श्रीराम सेनेशीही संबंध आहे.

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरण