मुलांपासून मला मिळते प्रेरणा, ऊर्जा -नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 05:17 IST2020-01-25T05:16:57+5:302020-01-25T05:17:49+5:30

‘लहान मुलांकडून मला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हटले.

I get inspiration from children, Narendra Modi | मुलांपासून मला मिळते प्रेरणा, ऊर्जा -नरेंद्र मोदी

मुलांपासून मला मिळते प्रेरणा, ऊर्जा -नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ‘लहान मुलांकडून मला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हटले. वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कामाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या या मुलांनी जे काम केले त्याची मोदी यांनी प्रशंसा केली.

मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात मोदी यांनी प्रधानमंत्री बालपुरस्काराने गौरव झालेल्या मुलांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘समाज आणि देशाबद्दलच्या कर्तव्याची मुलांमध्ये मला दिसलेली जागरूकता अभिमान वाटावी, अशी आहे. तुम्ही तरुण मित्रांनी केलेल्या धाडसी कामांबद्दल मी जेव्हा ऐकतो, तुमच्याशी बोलतो तेव्हा मला तुमच्याकडून प्रेरणा व ऊर्जा मिळते,’ असेही मोदी म्हणाले. 

Web Title: I get inspiration from children, Narendra Modi