शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मी राजकारणी नव्हे तर विद्यार्थी

By admin | Updated: March 5, 2016 02:49 IST

राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा किंवा कोणतीही निवडणूक लढविण्याचा माझा उद्देश नाही, असे जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने शुक्रवारी स्पष्ट केले

नवी दिल्ली : राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा किंवा कोणतीही निवडणूक लढविण्याचा माझा उद्देश नाही, असे जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार याने शुक्रवारी स्पष्ट केले. राजकीय महत्त्वाकांक्षेविषयी तर्कवितर्क सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्याने प्रथमच पत्रपरिषदेत बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली.फासावर लटकविण्यात आलेला संसद हल्ल्यातील आरोपी अफझल गुरू हा भारताचा नागरिक असून त्याच्या मृत्युदंडाबाबत चर्चा होणे कायदेशीर ठरते. तो माझा गुरू किंवा आदर्श नाही. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाचा आत्महत्या करणारा विद्यार्थी रोहित वेमुला याला मी आदर्श मानतो. मला भविष्यात शिक्षक बनणे आवडेल. माझ्या राजकीय महत्त्वाकांक्षेविषयी प्रश्न बाजूला सारला जावा. देशातील जनतेने मला निवडून दिलेले नाही. मी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आहे. देशाचा राष्ट्रपती नाही, असेही तो म्हणाला.(लोकमत न्यूज नेटवर्क)> २० दिवसानंतर कॅम्पसमध्ये...देशद्रोहाच्या आरोपाखाली १२ फेब्रुवारी रोजी अटक झाल्यापासून कन्हैया कुमार तिहार कारागृहात होता. गुरुवारी त्याची मुक्तता होताच कॅम्पसमध्ये जल्लोष झाला. विद्यार्थी मित्रांनी त्याचे जोरदार स्वागत केले. त्याने त्यावेळी विद्यापीठ परिसराबाहेर जवळपास तासभर भाषण दिले होते.