शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पती प्रेयसीसोबत रंगेहाथ सापडला! पत्नीचा संयम सुटला, घरच्यांना घेऊन आली; पुढं घडलं ते भयंकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 16:08 IST

विवेक दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ सापडल्याने घरच्यांनी त्याला मारहाण केली.

सोशल मीडियाच्या या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. नेहमी कोणती ना कोणती भन्नाट घटना किंवा हास्यास्पद व्हिडीओ समोर येत असतात. आता एक हास्यास्पद तितकीच धक्कादायक व्हिडीओ नेटकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. खरे तर विशाखापट्टणममध्ये एका महिलेने आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडले अन् एकच गोंधळ घातला. पतीने आपला विश्वासघात केला असल्याचा आरोप करत तिने पतीच्या प्रेयसीला मारहाण केली. संबंधित पत्नीला पतीचे हे प्रेमप्रकरण आधीच समजले होते. त्यामुळे तिने सोबत कुटुंबीयांना आणले आणि पतीचा खरा चेहरा उघड केला. 

विवेक दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ सापडल्याने घरच्यांनी त्याला मारहाण केली. मात्र, त्याने पत्नीला सोडून दिल्याचा दावा करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. संबंधित पती विवेक हा एका स्पामध्ये काम करतो. तिथे तो दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडला. त्याने तिला महागड्या भेटवस्तू देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय हे दोघे शहरातील समुद्रकिनारे, उद्याने आणि हॉटेल्समध्ये फिरत असत. विवेकने पत्नीशी भांडण झाले असल्याचे सांगून प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी घटस्फोटासाठी अर्ज केला असल्याचे सांगितले. 

घरच्यांनी दिला चोप

विवेक आणि त्याच्या प्रेयसीचे दोन वर्षांपासून हे अफेअर सुरू असल्याचे पत्नीने उघड केले. तिला याबद्दल संपूर्ण माहिती होती पण भविष्यात विवेक बदलेल या आशेवर त्याची पत्नी होती. त्या दोघांमधील वाढती जवळीक पाहून तिने विवेकच्या प्रेयसीला धमकावले आणि त्याच्यापासून दूर राहण्यास सांगितले होते. पण तिने दुर्लक्ष केले. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देखील विशाखापट्टणम येथून अशीच घटना समोर आली होती. इथे नक्षत्रा नावाच्या महिलेने ३० मे २०२४ रोजी विशाखापट्टणम येथील पतीच्या कार्यालयासमोर न्यायाच्या मागणीसाठी आंदोलन केले. संबंधित महिला नक्षत्राने तिच्या पतीला एका खोलीत अन्य महिलेसोबत रंगेहाथ पकडले. याच रागातून तिने त्याला मारहाण देखील केली. तिचा पती तेजा याने घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले असल्याचा आरोप तिने केला. २०१३ मध्ये नक्षत्रा आणि तेजा एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रेमात पडले. मग त्यांनी २०१७  मध्ये लग्न केले. दोघांना एक अपत्य आहे. पती तेजा हा मागील काही दिवसांपासून आपला छळ करत असल्याचा आरोप नक्षत्राने केला. 

टॅग्स :visakhapatnam-pcविशाखापट्टणमhusband and wifeपती- जोडीदारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट