शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! वॉशिंग मशिनमध्ये बुडून 2 जुळ्या भावांचा मृत्यू

By admin | Updated: February 26, 2017 07:45 IST

नवी दिल्लीच्या रोहिणी परिसरात शनिवारी एक मन हेलावणारी घटना घडली. येथे 3 वर्षाच्या दोन जुळ्या भावांचा वॉशिंग मशीनमध्ये बुडाल्याने मृत्यू

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - नवी दिल्लीच्या रोहिणी परिसरात शनिवारी एक मन हेलावणारी घटना घडली. येथे 3 वर्षाच्या दोन जुळ्या भावांचा वॉशिंग मशीनमध्ये बुडाल्याने मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी मुलांची आई वॉशिंग पावडर आणण्यासाठी जवळच्या दुकानात गेली होती. 
 
मिळालेल्या माहितीनुसार या मुलांची आई रेखा यांनी दुपारी साडे बाराच्या सुमारास कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनमध्ये पाणी भरलं पण वॉशिंग पावडर संपल्यामुळे त्या जवळच्या दुकानात गेल्या होत्या. त्याच दरम्यान ही दुर्देवी घटना घडली. धुण्यासाठी काढलेल्या कपड्यांवर उभं राहून मशिनमध्ये डोकावताना मुलं पडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.वॉशिंग मशिनमध्ये जवळपास 15 लिटर पाणी होतं. 
 
रेखा परत आल्यावर त्यांना मुलं दिसली नाहीत म्हणून त्यांनी पती रविंदर यांना याबाबत माहिती दिली. विमा कंपनीत काम करणारे रविंदर घरी आल्यावर दोन्ही मुलं वॉशिंग मशिनमध्ये बुडाल्याचं त्यांना दिसलं.तात्काळ त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं पण तेथे त्यांना मृत घोषीत केलं. 
 
कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सीआरपीसी कलम 174 अंतर्गत पोलीस चौकशी करत आहेत.