शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
4
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
5
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
6
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
7
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
8
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
9
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
10
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
11
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
12
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
13
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
14
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
15
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
16
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
17
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
18
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
19
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
20
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

निवार चक्रीवादळ बनले रौद्र, एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 04:17 IST

तामिळनाडू, पुडुचेरीतील अनेक भागांत वेगवान वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस, एक लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले

बुधवारी मध्यरात्री किंवा पहाटे धडकणार

चेन्नई/पुडुचेरी :  तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या किनारपट्टीच्या दिशेने घोंगावत निघालेल्या ‘निवार’ चक्रीवादळाने रौद्ररूप धारण केले असून, वेगवान वाऱ्यासोबत बुधवारी तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपले. अनेक भाग जलमय झाले असून,  हे चक्रीवादळ बुधवारी मध्यरात्री किंवा पहाटे तामिळनाडू आणि पुडुचेरी किनारपट्टीदरम्यान धडकणार असल्याने किनारपट्टीलगतच्या भागातील  एक लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. हे चक्रीवादळ दक्षिण किनारपट्टीवर धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले. निवार चक्रीवादळ सध्या कुड्डलोरच्या आग्नेयेला ५० किलोमीटर आणि पुडुचेरीच्या आग्नेयेला ४० किलोमीटरवर आहे.  

चक्रीवादळाचे केंद्र  पुढील तीन तासांच्या आत पुडुचेरीनजीकची किनारपट्टी ओलांडेल. अनेक भागांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱ्या स्थितीचा मुकाबला करण्यासाठी तामिळनाडू आणि पुडुचेरी प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने बुधवारी रात्री साडेअकरा वाजता जारी केलेल्या पत्रकानुसार ताशी  १२०-१३० ते १४५ किलोमीटर वाऱ्याच्या वेगाने वादळ बुधवारी मध्यरात्री आणि २६ नोव्हेंबरच्या पहाटे पुडुचेरी कराईकल आणि ममल्लापुरम दरम्यानची किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. चेन्नईसह वेल्लोर, कुड्डलोर, विल्लुपुरम, नागपट्टीणम, तिरुवरूर, चेंगलपेट, कांचीपुरम, तंजावर, तिरुवन्नामलाई, अरियालूर व पेराम्बुलूर येथे  २६ नोव्हेंबर रोजी सुटी, शाळा-महाविद्यालयांना शनिवारपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळTamilnaduतामिळनाडू