शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:05 IST

मतदान सुरू होण्यापूर्वीच प्रत्येक ईव्हीएममध्ये २५ हजार मते असतात हा दावा निवडणूक आयोगाने फेटाळला आहे.  

पटना - बिहार विधानसभा निवडणुकीबाबत विरोधकांकडून उठवणाऱ्या आरोप आणि सोशल मीडियात पसरत असलेल्या दाव्यांवर निवडणूक आयोगाने खुलासा केला आहे. मतदानात कुठल्याही प्रकारे अनियमितता झाली नसून सर्व आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. सोशल मीडियावर बऱ्याचदा चुकीची माहिती पसरवली जाते ज्यावर आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

बिहार विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण समोर आले आहे. ज्यात निवडणूक आयोगाने म्हटलं की, मतदानाची प्रक्रियेवर वारंवार अविश्वास दाखवणारे मतदारांची दिशाभूल करत लोकशाही व्यवस्थेला कमकुवत करत आहेत. मतदानावरील त्रुटीबाबत आरोप अशक्य आणि खोटे आहेत. मतदान सुरू होण्यापूर्वी सर्व मशिनची पडताळणी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमोर करण्यात येते. सर्व बूथ एजेंट मतदान केंद्रावर उपस्थित राहतात. त्यानंतर मतमोजणीही एजेंटच्या उपस्थितीत करून निकाल जाहीर केले जातात असं आयोगाने म्हटलं आहे.

EVM अत्यंत सुरक्षित 

ईव्हीएम मशीनला सील करण्यापासून ते सुरक्षित कक्षेत ठेवेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. त्याशिवाय मतदान केंद्रावर ईव्हीएमची सातत्याने देखरेख पोलीस, सीएपीएफ सुरक्षा २४ तास सीसीटीव्ही देखरेखीसह केली जाते. इतकेच नाही तर राजकीय पक्षांनाही सुरक्षेसाठी तैनात राहण्याची परवानगी दिली जाते असं निवडणूक आयोगाने सांगितले.

EVM मध्ये मतदानापूर्वीच २५ हजार मते कुठून येतात?

मतदान सुरू होण्यापूर्वीच प्रत्येक ईव्हीएममध्ये २५ हजार मते असतात हा दावाही निवडणूक आयोगाने फेटाळला आहे.  ईव्हीएमच्या प्रत्येक युनिटमध्ये अधिकाधिक २ हजार मते नोंदवली जाऊ शकतात आणि व्हीव्हीपॅट कमाल १५०० पावत्या छापू शकते. त्याहून अधिकची मते ना तांत्रिकदृष्ट्या ना प्रशासनाला देणे अशक्य आहे असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

दुबार आणि मृत नावे यादीतून वगळणे

निवडणूक आयोगाने मतदार यादीतून मतदारांना वगळण्यासाठी आणि "मत चोरी" करण्यासाठी एसआयआर प्रक्रिया वापरली जात असल्याच्या आरोपाचेही खंडन केले.  या प्रक्रियेचा उद्देश मृत व्यक्तींची नावे काढून टाकणे, दुबार नोंदी काढून टाकणे, हस्तांतरित मतदारांची माहिती अद्ययावत करणे आणि नवीन मतदारांचा समावेश करणे आहे . म्हणून SIR ही मतांची संख्या कमी करण्याची प्रक्रिया नाही तर मृत/डुप्लिकेट नावे काढून टाकण्यासाठी आणि योग्य व पात्र मतदारांचा समावेश करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आहे असं आयोगाने म्हटले आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : EC clarifies EVM doubts, refutes pre-poll vote rigging claims.

Web Summary : Election Commission dismisses EVM tampering allegations in Bihar polls. Assures EVMs are secure, monitored, and agents oversee the process. Each unit holds maximum 2000 votes. Voter list updates are routine, removing duplicates, not vote theft.
टॅग्स :EVM Machineईव्हीएम मशीनElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग