शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:52 IST

एका सब-इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन्ही बायका मृतदेह घेण्यासाठी एकमेकांशी भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लखनौमध्ये एका सब-इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या दोन्ही बायका मृतदेह घेण्यासाठी एकमेकांशी भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघींमुळे खूप गोंधळ झाला, परिस्थिती हाणामारीपर्यंत पोहोचली. घटनास्थळी पोहोचलेल्या गुडांबा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कसा तरी वाद शांत केला. अखेर मृतदेह सब-इन्स्पेक्टरच्या वडिलांकडे सोपवण्यात आला आणि जौनपूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सब-इन्स्पेक्टर संजय पाठक यांनी दोनदा लग्न केलं होतं. ते ओरईमध्ये तैनात होते आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत लखनौमध्ये राहत होते. पहिली पत्नी जौनपूरमध्ये राहत होती. त्यांच्यापासून त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. सोमवारी रात्री सब-इन्स्पेक्टरची प्रकृती अचानक बिघडली. रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पहिली पत्नी चंद्रकुमारी ही कुटुंबासह लखनौला पोहोचली. मंगळवारी, जेव्हा शवविच्छेदनानंतर मृतदेह घेण्याची वेळ आली तेव्हा दुसरी पत्नी आराधना आणि चंद्रकुमारी यांच्यात वाद सुरू झाला. एकीकडे चंद्रकुमारी मृतदेह तिच्याकडे सोपवण्याची मागणी करू लागली. दुसरीकडे, आराधना देखील मृतदेहावर दावा करू लागली. हा माझाच नवरा म्हणत दोन्ही महिला मृतदेहासाठी भांडत होत्या.

गोंधळ वाढताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी हस्तक्षेप केला. चर्चेनंतर मृतदेह वडिलांकडे सोपवण्यात आला. वडील मृतदेह घेऊन जौनपूरला रवाना झाले. त्यांनीच अंत्यसंस्कार केले. शवविच्छेदन अहवालात निरीक्षक संजय पाठक यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. गुडांबा पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री निरीक्षकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले. तपास सुरू आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यू