अभियांत्रिकी विद्यार्थिनीला हायकोर्टाचा दिलासा

By Admin | Updated: December 21, 2014 23:49 IST2014-12-21T23:49:31+5:302014-12-21T23:49:31+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थिनीला दिलासा दिला आहे.

High Court's relief to the engineering student | अभियांत्रिकी विद्यार्थिनीला हायकोर्टाचा दिलासा

अभियांत्रिकी विद्यार्थिनीला हायकोर्टाचा दिलासा

गपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थिनीला दिलासा दिला आहे.
स्नेहा वाघमारे असे विद्यार्थिनीचे नाव असून ती जरीपटका येथील रहिवासी आहे. ती एस. बी. जैन इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ॲन्ड रिसर्चमध्ये शिक्षण घेत आहे. तिचा जात प्रमाणपत्र वैधतेचा दावा पडताळणी समितीकडे प्रलंबित आहे. असे असतानाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने तिचा सातव्या सेमिस्टरच्या परीक्षेचा अर्ज स्वीकारला नव्हता. यामुळे तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने तिचा जात वैधतेचा दावा १ वर्षात निकाली काढण्याचे निर्देश पडताळणी समितीला दिले आहेत. तसेच, विद्यापीठाने तिला परीक्षेला बसू द्यावे आणि संस्थेने ती पात्र असल्यास आठव्या सेमिस्टरमध्ये प्रवेश द्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Web Title: High Court's relief to the engineering student