शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे भारताविरुद्ध छुपे युद्ध

By admin | Updated: September 28, 2015 01:57 IST

पाकिस्तानने दहशतवादाच्या आडून भारताविरुद्ध छुपे युद्ध पुकारले असल्याचा आरोप कें द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी केला आणि देशापुढील हे एक मोठे आव्हान असल्याचेही स्पष्ट केले.

लखनौ : पाकिस्तानने दहशतवादाच्या आडून भारताविरुद्ध छुपे युद्ध पुकारले असल्याचा आरोप कें द्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शनिवारी केला आणि देशापुढील हे एक मोठे आव्हान असल्याचेही स्पष्ट केले.येथे आयोजित एका परिषदेत ‘भारताची प्रगती, सुरक्षा स्थिती आणि दिशा’ या विषयावर ते बोलत होते. दहशतवादाविरुद्ध संयुक्त अरब अमिरातीसोबत (यूएई) सहकार्य आणि गोपनीय सूचनांच्या देवाणघेवाणीबाबत समझोत्याचा उल्लेख करताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, आम्ही या मुद्यावर अनेक देशांना विश्वासात घेतले असून राजनैतिक उपायही केले जात आहेत. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे; परंतु भारताकडूनही त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले जात आहे, याकडे लक्ष वेधताना सिंह म्हणाले, पाकिस्तान आणि चीनला लागून असलेल्या देशाच्या सीमा अत्यंत संवेदनशील आहेत आणि त्या अनुषंगाने सुरक्षा बंदोबस्तही चोख ठेवला जातो. नेपाळ आणि भूतानलगतच्या सीमांवर कुठलीही समस्या नसली तरी बांगलादेश आणि म्यानमारची सीमा सक्रिय आहे. काय म्हणाले गृहमंत्रीरालोआ सरकार सत्तेत आल्यापासून जम्मू-काश्मीर सीमेवर घुसखोरीच्या घटना कमी झाल्या आहेत. २०१३ साली घुसखोरीच्या २७७ आणि २०१२ मध्ये २६४ घटना घडल्या होत्या. त्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत फक्त १५ घटनांची नोंद आहे. जगभरात थैमान घालणारी इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) ही दहशतवादी संघटना भारतात कदापि पाळेमुळे रोवू शकणार नाही आणि याचे संपूर्ण श्रेय या देशातील मुस्लिमांना आहे. भारताच्या वाढत्या सामरिक शक्तीने राष्ट्रविरोधी घटक त्रस्त झाले आहेत. (वृत्तसंस्था)