शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेत सरकार ‘जिंकले’

By admin | Updated: March 21, 2015 01:20 IST

भाजपाप्रणित रालोआ सरकारसाठी प्रतिष्ठेची बनलेली खाण व खनिज तसेच कोळसा लिलाव अशी दोन्ही विधेयक शुक्रवारी राज्यसभेत पारित झाली.

हरीश गुप्ता - नवी दिल्लीभाजपाप्रणित रालोआ सरकारसाठी प्रतिष्ठेची बनलेली खाण व खनिज तसेच कोळसा लिलाव अशी दोन्ही विधेयक शुक्रवारी राज्यसभेत पारित झाली. पुरेशा संख्याबळाऐवजी राज्यसभेत या दोन्ही विधेयकांचे भविष्य अधांतरी सापडले होते. मात्र संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी बहुतांश प्रादेशिक आणि बिगर रालोआ पक्षांच्या पाठिंब्याने ही दोन्ही विधेयके पारित करून घेण्यात सरकार यशस्वी ठरले. या विधेयकांना लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यामुळे राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर केंद्र सरकारने काढलेल्या वटहुकूमाचे रूपांतर कायद्यात होईल.शुक्रवारी राज्यसभेत या दोन्ही विधेयकावर काँग्रेस आणि डावे पक्ष राज्यसभेत एकाकी पडल्याचे चित्र दिसले. तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पार्टी, अण्णाद्रमुक, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस अशा सर्व पक्षांनी विधेयकास पाठिंबा दिला. काँग्रेस आणि डाव्यांनीही एका मर्यादेपलीकडे या दोन्ही विधेयकांचा मार्ग न अडवण्याबाबत सरकारला आश्वस्त केले होते, यात शंका नाहीच. यामुळे सरकारला ही विधेयके पारित करणे सोपे झाले. लोकसभेत आधीच पारित झालेले खाण व खनिज(विकास व नियमन) दुरुस्ती विधेयक, २०१५राज्यसभेत उणापुऱ्या तासाभरात मंजूर झाले.पुन्हा वटहुकूम?संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वादग्रस्त भूसंपादन विधेयक मंजूर होण्याची चिन्हे नसल्याने यासंदर्भात सरकार पुन्हा वटहुकूम काढणार की तो आपसूक रद्द होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. येत्या ५ एप्रिलला संबंधित वटहुकूमाची मुदत संपणार आहे. राज्यसभेत भूसंपादन विधेयक मांडलेच गेले नसल्याने येत्या ५ एप्रिलला हा वटहुकूम आपसूक रद्द होणार आहे.