शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

सरकार-न्यायव्यवस्था यांचेतील कोंडी सुटली

By admin | Updated: September 8, 2016 05:14 IST

सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून सरकार आणि न्यायव्यवस्थादरम्यानच्या तीव्र मतभेदांमुळे निर्माण झालेली कोंडी सुटल्याचे दिसते

हरीश गुप्ता,  नवी दिल्लीसर्वोच्च आणि उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून सरकार आणि न्यायव्यवस्थादरम्यानच्या तीव्र मतभेदांमुळे निर्माण झालेली कोंडी सुटल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांची लवकरच भेट होणार आहे. त्यानंतर मतभेद संपुष्टात आल्याची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता असून, एक नवीन पर्व सुरू होईल.१५ आॅगस्ट रोजी मोदी आणि ठाकूर यांच्यात राष्ट्रपती भवनात २० मिनिटे बैठक झाली होती. केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी जोरदार पाठपुरावा केल्याने स्वातंत्र्यदिनीच ही कोंडी सुटल्याचे समजते. सरकारसोबत या मुद्यांवर झालेल्या औपचारिक चर्चेअंती न्यायव्यस्थेने उच्च न्यायालायात न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी कॉलेजियमने शिफारस केलेल्या; परंतु सचोटी आणि प्रामाणिकतेबाबत शंका असलेल्या किंवा गुप्तचर विभागाने शहानिशा केल्याअंती नियुक्तीसंदर्भातील निकषांची पूर्तता न करणाऱ्यांची नावे मागे घेण्याचे मान्य केले आहे. कॉलेजियममार्फत न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबत सरकारकडे काही नावांची शिफारस केली जाते. तथापि, नियुक्तीसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याआधी शिफारस करण्यात आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कागदपत्रांची शहानिशा करण्यास गुप्तचर विभागाला सांगितले जाते. नेमका यालाच न्यायव्यवस्थेचा आक्षेप होता. ही बाब म्हणजे सराकरचा थेट हस्तक्षेप असल्याचे न्यायव्यवस्थेचे म्हणणे होते. आता मात्र मध्यम मार्ग काढण्यात आला असून, पहिली यादीही लवकरच जारी होईल.