शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खेड सेझचे शिक्के काढण्याचा प्रस्ताव शासन दरबारी पडून

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

पुणे: खेड विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) साठी टप्पा दोन व तीन मध्ये संपादीत न झालेल्या जमिनीवरील खेड सेझचे शिक्के कमी करण्यासाठी तीन महिन्यापूर्वीच शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. परंतु शेरे कमी करण्यासंदर्भांत अद्याप शासनाकडून कोणत्याही सूचना आल्या नसल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले.

पुणे: खेड विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) साठी टप्पा दोन व तीन मध्ये संपादीत न झालेल्या जमिनीवरील खेड सेझचे शिक्के कमी करण्यासाठी तीन महिन्यापूर्वीच शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. परंतु शेरे कमी करण्यासंदर्भांत अद्याप शासनाकडून कोणत्याही सूचना आल्या नसल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
भारत फोर्ज लि. कंपनी आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या सामंजस्य करारा नुसार राजगुरुनगर येथे विशेष आर्थिक क्षेत्र घोषित करण्यात आले. यासाठी पहिल्या टप्प्यात १७ गावांमधील सुमारे १७०५ हेक्टर क्षेत्र संपादीत करण्यात आले. परंतु केंद्र शासनाच्या विशेष आर्थिक क्षेत्र संबंधातील कर प्रणातील बदल झाल्याने खेड सेझ कडे उद्योजकांनी पाठ फिरवली. यामुळे गेल्या आठ-नऊ वर्षांत येथे कोणताही विकास झाला नाही किंवा कंपन्या आल्या नाही. दरम्यानच्या काळात शासनाने खेड सेझच्या टप्पा दोनसाठी सात गावांतील १६५६ हेक्टर आणि टप्पा तीन साठी ६ गावातील १८६६ हेक्टर जमिन संपादीत करणारी अधिसूचना काढली. यामुळे सुमारे ३ हजार ५२२ हेक्टर क्षेत्रावर खेड सेझ असे शेरे लावण्यात आले. शासनाने खेड सेझ रद्द केल्याने संपादीत न झालेल्या व खेड सेझचे शिक्के कमी करण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शे˜ी यांच्या नेतृत्वाखाली मोठी पदयत्रा काढण्यात आली.
या आंदोलना नंतर शासनाने जिल्हाधिाकरी सौरभ राव यांना खेड सेझ मधील संपादीत न झालेल्या जमिनीवरी शेरे कमी करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले. यानुसार राव यांनी एप्रिल महिन्यातच राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. परंतु गेल्या चार महिन्यात याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.