शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

Corona पासून असे रहा सुरक्षित, Google ने सांगितल्या या 5 मोठ्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 2:29 PM

फेसबूक, गूगल, ट्रविटर, मायक्रोसॉफ्ट, युट्यूब, लिंक्डइन आणि रिडीट या कंपन्याही या व्हायरसशी संबंधित चुकीची माहिती नष्ट करण्यासाठी एकत्र आल्या आहेत. तर Google ने 'DO THE FIVE. Help stop coronavirus' या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे 'DO THE FIVE. Help stop coronavirus' असे आहे गूगलच्या उपक्रमाचे नावदेशातील रुग्णांची संख्या 169 वरराज्यात सध्या कोरोनाचे 49 रुग्ण, यातील 40 रुग्ण आले आहेत परदेशातून

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसला जागतीक महामारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर यूजर्सना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यासाठी केवळ टेलिकॉम कंपन्याच नाही, तर फेसबूक, युट्यूब आणि गूगलनेही पावले उचलायला सुरुवात केली आहे. 

फेसबूक, गूगल, ट्रविटर, मायक्रोसॉफ्ट, युट्यूब, लिंक्डइन आणि रिडीट या कंपन्याही या व्हायरसशी संबंधित चुकीची माहिती नष्ट करण्यासाठी एकत्र आल्या आहेत. तर Google ने 'DO THE FIVE. Help stop coronavirus' या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

असा आहे गूगलचा उपक्रम -

आपण गूगलवर सर्च करण्यासाठी गेलात तर तेथे आपल्याला 'DO THE FIVE. Help stop coronavirus' असे लिहिलेली एक लिंक दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर 5 गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी पाळल्यानंतर तुम्ही व्हायरसपासून सुरक्षित राहू शकता.

सांगितल्या आहेत या पाच गोष्टी -

  • थोड्या-थोड्या वेळाने हात धुणे, 
  • खोकलताना तोंडाला हात लावण्याएवडी कोपरा लावणे.
  • नेहमी-नेहमी तोंडाला स्पर्ष न करणे
  • इतरांपासून योग्य अंतरावर राहा
  • आपल्याला अस्वस्थ वाटत असेल तर घराबाहेर पडू नये

खरे पाहिले, तर गुगलचा हा उपक्रम लोकांसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतो. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 169 वर पोहोचला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा देशात सर्वाधिक असला तरी, संसर्गाचे प्रमाण कमी आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 49 रुग्ण आहेत. मात्र यातले ४० रुग्ण परदेशातून राज्यात आले आहेत. या लोकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या केवळ ९ इतकी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी यांनी दिली आह.

दिल्लीपासून केरळपर्यंत पसरलेल्या या व्हायरसने पश्चिम बंगालमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे केंद्र शासित प्रदेश असलेल्या लडाखमधील एक भाग पूर्णपणे देखरेखीखाली ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानंतर कारगिल सांकू आणि जवळपासची सर्व गावे विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आली आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे सॅम्पल्सदेखील तपासनीसाठी पाठवण्यात आले आहेत. लडाखमध्ये आतापर्यंत 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoogleगुगलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्लीMaharashtraमहाराष्ट्र