Water on Moon: चांद्रयान-2 ची करणी, चंद्रावर सापडले पाणी; लँडिंगला अपयश आले तरी आहे 'जिवंत'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 05:29 PM2021-08-12T17:29:11+5:302021-08-12T17:33:18+5:30

Chandrayaan-2: जियोक्लेसच्या विशाल खडकांमध्ये चंद्रावरील अंधारात असलेल्या मैदानी भूभागापेक्षा जास्त पाण्याचे अणू साप़डले आहेत. चांद्रयानाकडून ज्या प्रकारे अपेक्षित होते, तशी माहिती मिळालेली नाही. परंतू, जी मिळाती ती महत्वाची आहे. 

Good news from ISRO; Chandrayaan-2 orbiter detects water molecules on moon surface | Water on Moon: चांद्रयान-2 ची करणी, चंद्रावर सापडले पाणी; लँडिंगला अपयश आले तरी आहे 'जिवंत'

Water on Moon: चांद्रयान-2 ची करणी, चंद्रावर सापडले पाणी; लँडिंगला अपयश आले तरी आहे 'जिवंत'

googlenewsNext

इस्त्रोचे चंद्रावरील दुसऱ्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. चांद्रयान-2 (Chandrayaan-2) ने चंद्रावर (moon) पाण्याचे अंश शोधले आहेत. इस्त्रोचे माजी अध्यक्ष ए एस किरण कुमार यांच्या मदतीने लिहिन्यात आलेल्या या रिसर्च पेपरमध्ये म्हटले आहे की, चांद्रयान २ मध्ये ‘इमेजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर’ (आयआयआरएस) हे उपकरण बसविण्यात आले आहे. हे उपकरण वैज्ञानिक आकडेवारी मिळविण्यासाठी 100 किमीच्या एका ध्रुवीय कक्षेशी संबंधीत काम करत आहे. (Chandrayaan-2 confirms water on Moon surface.)

करंट सायन्स पत्रिकेमध्ये हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. यामध्ये म्हटले आहे की, आयआयआरएस द्वारे टिपण्यात आलेल्या सुरुवातीच्या माहितीमध्ये 29 डिग्री उत्तरेकडे आणि 62 डिग्री उत्तरेकडील अक्षांसामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचे छोटे छोटे कण आणि मिक्स न झालेले हाइड्रोक्सिल (ओएच) व पाण्याचे (H2O) अणू स्पष्टपणे आढळले आहेत. 

प्लेजियोक्लेसच्या विशाल खडकांमध्ये चंद्रावरील अंधारात असलेल्या मैदानी भूभागापेक्षा जास्त पाण्याचे अणू साप़डले आहेत. चांद्रयानाकडून ज्या प्रकारे अपेक्षित होते, तशी माहिती मिळालेली नाही. परंतू, जी मिळाती ती महत्वाची आहे. 

भारताने आपले दुसरी चांद्र मोहिम 22 जुलै 2019 मध्ये आखली होती. मात्र, चांद्रयानाला सुखरुप चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविणारा लँडर विक्रम 7 सप्टेंबरला सॉफ्ट लँडिंग करण्यास असफल ठरला होता. चांद्रयान-2 च्या लँडरमध्ये ‘प्रज्ञान’ नावाचा रोव्हरही होता. ऑर्बिटर अद्यापही चांगले काम करत आहे. तसेच चांद्रयान१ मिशनला आकडे पाठवतो. 

भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरल्यानंतरही  देशभरातून इस्रोला पाठिंबा मिळाला होता. दरम्यान, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने चांद्रयान-2 मोहिमेला मिळालेल्या पाठिंब्यासाठी देशवासियांचे आभार मानले होते. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या आपल्या 47 दिवसांच्या प्रवासात चांद्रयान-2 ने अनेक अवघड टप्पे पार केले. मात्र शेवटचा टप्पा पार करताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटून त्याचे चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग झाले होते. त्यानंतर चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्टभागावर पडलेल्या विक्रम लँडरचे छायाचित्र पाठवले होते. 

Web Title: Good news from ISRO; Chandrayaan-2 orbiter detects water molecules on moon surface

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.