सोन्याच्या बाजारात अच्छे दिन आ गये...

By Admin | Updated: May 22, 2014 13:34 IST2014-05-22T13:34:21+5:302014-05-22T13:34:21+5:30

सोने आयातीवरील निर्बँध शिथिल करून रिझर्व्ह बँकेने सोने स्वस्त होण्याचे संकेत दिले आहेत.

Good day in the gold market ... | सोन्याच्या बाजारात अच्छे दिन आ गये...

सोन्याच्या बाजारात अच्छे दिन आ गये...

>ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २२ - सोने आयातीवरील निर्बँध शिथिल करून रिझर्व्ह बँकेने सोने स्वस्त होण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे बाजारात खरेदी वाढणार असून सोने व्यापारांनी ही मोदी सरकारचीच भेट असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी रुपयाच्या अवमूल्यनामुळे आणि चालू खात्यावर पडलेल्या ताणामुळे सोन्याच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले होते. सोन्याच्या आयातीमुळे लाखो डॉलर्सचे चलन विदेशांमध्ये जात असल्याने आयातीवर मर्यादा घातण्याल आल्या होत्या. परिणामी सोन्याचे भाव चढे राहिले होते आणि खरेदी मंदावली होती.
आता आरबीआयने निर्बंध शिथिल केल्याने सोने आयात वाढेल व भाव स्वस्त होतील अशी अपेक्षा आहे.सोने गेल्या दोन दिवसांमध्ये प्रति १० ग्रॅम ५०० रुपयांनी स्वस्त झाले असून सुमारे २८,३०० रुपयांच्या आसपास घोटाळत आहे. मौल्यवान धातुंच्या व्यापारावर झालेला हा मोदी इम्पॅक्ट असल्याची भावना या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इंडिया बुलियन व ज्युवेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहित कुंभोज यांनी सांगितले की मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वीच बुलियन इंडस्ट्रीला दिलेले वचन पूर्ण केले आहे. या क्षेत्रामध्ये अच्छे दिन आ रहे है असे उद्गार कुंभोज यांनी काढले.

Web Title: Good day in the gold market ...