गोवा सरकारने घातली श्रीराम सेनेवर बंदी

By Admin | Updated: August 21, 2014 02:13 IST2014-08-21T02:13:54+5:302014-08-21T02:13:54+5:30

श्रीराम सेनेला गोव्यात बंदी घालण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी बुधवारी केली.

Goa government imposed on Shriram Senere | गोवा सरकारने घातली श्रीराम सेनेवर बंदी

गोवा सरकारने घातली श्रीराम सेनेवर बंदी

पणजी : श्रीराम सेनेला गोव्यात बंदी घालण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी बुधवारी केली. सेनेचे प्रमोद मुतालिक यांनी गोव्यात शाखा उघडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बिगर शासकीय संस्थांनी तसेच स्थानिकांनी त्यास विरोध केला होता. मुतालिक यांनी सप्टेंबर्पयत गोव्यात शाखा उघडू, असे आव्हान दिले होते. मुतालिकने गोव्याच्या पब संस्कृतीला विरोध केला होता. मुतालिक यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे गोवा सरकारने स्पष्ट केले होते. मुतालिकला कायदा हातात घेऊ देणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले होते. काँग्रेसनेही मुतालिकला गोव्यात प्रवेश देण्यास ठाम विरोध केला होता.   

 

Web Title: Goa government imposed on Shriram Senere