'न्यूझीलंडच्या धावांपेक्षा जास्त सेल्फी...', IND vs NZ सामन पाहण्यासाठी गेलेल्या शशी थरुरांचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:30 IST2026-01-22T14:28:54+5:302026-01-22T14:30:01+5:30

भारत आणि न्यूझीलंडमधील पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळवण्यात आला.

'Given more selfies than New Zealand runs', Shashi Tharoor's tweet after going to watch IND vs NZ match goes viral | 'न्यूझीलंडच्या धावांपेक्षा जास्त सेल्फी...', IND vs NZ सामन पाहण्यासाठी गेलेल्या शशी थरुरांचे ट्विट

'न्यूझीलंडच्या धावांपेक्षा जास्त सेल्फी...', IND vs NZ सामन पाहण्यासाठी गेलेल्या शशी थरुरांचे ट्विट

Shashi Tharoor IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची T20I मालिका बुधवारी सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना 21 जानेवारी रोजी नागपूरमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडवर 48 धावांनी शानदार विजय मिळवला. भारताच्या या दणदणीत कामगिरीने मालिकेला रंगतदार सुरुवात झाली.

सामना पाहण्यासाठी शशी थरूर स्टेडियममध्ये

दरम्यान, या सामन्याला काँग्रेसचे खासदार शशी थरूर हेदेखील उपस्थित होते. सामना पाहिल्यानंतर त्यांनी केलेले एक मजेशीर ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

न्यूझीलंडच्या धावांपेक्षा जास्त सेल्फी...

शशी थरूर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'नागपूर दौऱ्याची सांगता स्टेडियममध्ये बसून #INDvNZT20I सामना पाहत केली. एअर कंडिशन्ड बॉक्समध्ये नव्हे, तर 45 हजार प्रेक्षकांच्या जोश आणि आवाजात. न्यूझीलंडने जितक्या धावा केल्या, त्यापेक्षा जास्त सेल्फी द्याव्या लागल्या, पण सामना आणि भारताच्या विजयाचा पूर्ण आनंद घेतला.'

सामन्याचा निकाल काय लागला?

नागपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या T20I सामन्यात भारताने नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 विकेट्स गमावत 238 धावांचा भक्कम डोंगर उभा केला. भारताकडून अभिषेक शर्मा याने अवघ्या 35 चेंडूत 84 धावांची वादळी खेळी करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

न्यूझीलंडचा अपुरा प्रयत्न

238 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला 20 षटकांत 7 विकेट्स गमावत केवळ 190 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने सामना 48 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

Web Title : शशि थरूर: न्यूजीलैंड के रनों से ज्यादा सेल्फी, IND vs NZ मैच में!

Web Summary : शशि थरूर नागपुर में भारत बनाम न्यूजीलैंड टी20 मैच देखने गए। उन्होंने ट्वीट किया कि उन्होंने न्यूजीलैंड के रनों से ज्यादा सेल्फी ली। भारत ने 48 रनों से मैच जीता और श्रृंखला में 1-0 की बढ़त बनाई।

Web Title : Shashi Tharoor: More selfies than New Zealand runs at IND vs NZ.

Web Summary : Shashi Tharoor attended the India vs New Zealand T20I match in Nagpur. He tweeted that he took more selfies than New Zealand scored runs. India won the match by 48 runs, taking a 1-0 lead in the series.