Gehlot's personal criticism of Sachin Pilot; The Congress leadership was upset | गेहलोत यांची सचिन पायलटांवर वैयक्तीक टीका; काँग्रेस नेतृत्व झाले नाराज

गेहलोत यांची सचिन पायलटांवर वैयक्तीक टीका; काँग्रेस नेतृत्व झाले नाराज

बंडखोरी केल्याने उपमुख्यमंत्री पदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हकालपट्टी केलेल्या सचिन पायलटांनाकाँग्रेसने अजुनही दारे उघडी असल्याचा संदेश पाठविला आहे. पायलट यांना माघारी घेण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्यावर गंभीर आरोप करत वैयक्तीक टीकाही केली आहे. यामुळे गेहलोत यांच्यावर काँग्रेसचे नेतृत्व नाराज झाले आहे.

 
सरकार पाडण्यासाठी पैसे देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप गेहलोत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. यावरून भाजपाच्या दोन नेत्यांनाही विशेष चौकशी पथकाने ताब्यात घेतले होते. तसेच यानंतर या पथकाने पायलट यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठविली होती. यावरून आधीच गेहलोत यांचे काँग्रेस नेतृत्वाने कान खेचले होते. आज गेहलोत यांनी पत्रकार परिषद घेऊन पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 


गेहलोत यांनी पायलट यांचे थेट नाव घेत आमदारांना 20-20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात पायलट यांचा हात होता. सोन्याची सुरी ताटातील पदार्थ खाण्यासाठी नसते. चांगले हिंदी-इंग्रजी बोलले म्हणजे होत नाही. तुमच्या हृदयात देशासाठी काय आहे, पक्षाची नीती, विचारधारा याच्यासाठी तुम्ही काय आहात हे पाहिले जाते. पायलट यांनी दिल्लीच्या काही नेत्यांच्या नादी लागून सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांचा यात थेट सहभाग होता. पायलट यांच्याविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत, असे आरोप गेहलोत यांनी केले आहेत. 


आज सीबीआय, आयटी आणि ईडीचा दुरुपयोग केला जात आहे. मी तर तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलो आहे. 40 वर्षं राजकारणात घालवली. आम्हीतर नवीन पिढी तयार करत आहोत. उद्याचा काळ त्यांचा आहे. आम्ही खूप त्रास झेलला. गेल्या 40 वर्षांत ज्यांनी संघर्ष केला ते लोक आज मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या मोठ्या पदांवर आहेत, असा टोलाही त्यांनी पायलट यांच्या महत्वाकांक्षेवर लगावला.

अन्य महत्वाच्या बातम्या...

बापरे! अवघ्या 10 वर्षांच्या मुलाने बँकेतून 30 सेकंदांत 10 लाख रुपये उडविले; सीसीटीव्ही पाहून पोलीस हादरले

...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा

...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल

सोने स्वस्त झाले! झटपट जाणून घ्या आजचे दर

फ्लिपकार्टचा कोरोनाकाळात चौकार! 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक; बाजारमुल्य $24.9 अब्जांवर

एकतर सैन्याची नोकरी सोडा किंवा फेसबुक; याचिकाकर्त्या लेफ्टनंट कर्नलला न्यायालयाने सुनावले

बापरे! लग्नासाठी व्हर्जिनीटीची गॅरंटी देतेय मॅट्रिमोनियल साईट Shadi.com; विचारताच माफी मागितली

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Gehlot's personal criticism of Sachin Pilot; The Congress leadership was upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.