फ्लिपकार्टचा कोरोनाकाळात चौकार! 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक; बाजारमुल्य $24.9 अब्जांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 09:33 PM2020-07-14T21:33:25+5:302020-07-14T21:37:57+5:30

वॉलमार्टने 2018 मध्ये 16 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून फ्लिपकार्टमध्ये 77 टक्के हिस्सेदारी मिळविली होती.

Flipkart Group today closed an additional $1.2 billion equity; values at $24.9 billion | फ्लिपकार्टचा कोरोनाकाळात चौकार! 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक; बाजारमुल्य $24.9 अब्जांवर

फ्लिपकार्टचा कोरोनाकाळात चौकार! 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक; बाजारमुल्य $24.9 अब्जांवर

Next

ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टने वॉलमार्टच्या मदतीने तब्बल 1.2 अब्ज डॉलरचा निधी मिळविला आहे. यामुळे फ्लिपकार्टचे बाजारमुल्य $24.9 अब्जावर गेले आहे. हा कोरोना काळात फ्लिपकार्टचा विक्रमच आहे. ही गुंतवणूक वॉलमार्ट आणि अन्य सहकारी गुंतवणुकदारांनी केली आहे.

 
वॉलमार्टने 2018 मध्ये 16 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून फ्लिपकार्टमध्ये 77 टक्के हिस्सेदारी मिळविली होती. फ्लिपकार्टने सांगितले की, या गुंतवणुकीच्या टप्प्यामध्ये समुहाच्या शेअरधारकांनी भाग घेतला. या गुंतवणुकीमुळे फ्लिपकार्टचे मुल्यांकन 24.9 अब्ज डॉलर झाले आहे. हा पैसा यंदाच्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये मिळणार आहे. 


फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, कंपनीमध्ये वॉलमार्टने सुरुवातीला गुंतवणूक केल्यावर आम्ही सहकार्य, औद्योगिक आणि नवीन सेवांच्या मदतीने सेवेचा मोठा विस्तार केला आहे. आज आम्ही इलेक्ट्रॉनिक्स आणि फॅशन क्षेत्रात सर्वात पुढे आहोत. अन्य सामान्य श्रेणींमध्ये आणि किराना आदीमध्येही विस्तार करत आहोत. कंपनी पुढील वर्षी 20 कोटी ग्राहकांना ऑनलाईन आणण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे.

फ्लिपकार्टची स्थापना 2007 मध्ये झाली होती. फ्लिपकार्ट समुहामध्ये डिजिटल पेमेंटसाठी फोन पे, फॅशन क्षेत्रामध्ये मंत्रा आणि ईकार्ट यांचा समावेश आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

एकतर सैन्याची नोकरी सोडा किंवा फेसबुक; याचिकाकर्त्या लेफ्टनंट कर्नलला न्यायालयाने सुनावले

बापरे! लग्नासाठी व्हर्जिनीटीची गॅरंटी देतेय मॅट्रिमोनियल साईट Shadi.com; विचारताच माफी मागितली

'वर्क फ्रॉम होम' काळात SBI चा मोठा निर्णय; तब्बल 1000 कोटी रुपये वाचणार

Xiaomi आता 'हवा' देखील भरणार; टायर पंक्चर झाल्यास काही क्षणांत मदतीला येणार

काँग्रेसने हटविले, सचिन पायलटांना लगेचच भाजपची खुली ऑफर

रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार; मुंबई महापालिकेच्या पथकाला दरवाजाही उघडला नाही

क्रूरतेचा कळस! चीनने गलवानमध्ये मृत सैनिकांचे बलिदान नाकारले; अंत्यसंस्कारास नकार

 

Web Title: Flipkart Group today closed an additional $1.2 billion equity; values at $24.9 billion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.