बापरे! लग्नासाठी व्हर्जिनीटीची गॅरंटी देतेय मॅट्रिमोनियल साईट Shadi.com; विचारताच माफी मागितली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 08:12 PM2020-07-14T20:12:29+5:302020-07-14T21:06:36+5:30

लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी शादी डॉट कॉम या वेबसाईटवर अशाचप्रकारे जाळे टाकण्यात येत आहे. प्रेम आणि विश्वासाऐवजी कौमार्यावरून लोकांना आकर्षित करण्याचा गोरखधंदाच उघडण्यात आला आहे. या वर टीकाही होऊ लागली आहे.

लग्नासाठी आता वधू-वर सुचक मंडळाची जागा मॅट्रिमोनियल साईटनी घेतलेली आहे. यावर अकाऊंट उघडून त्यांना हवी असलेली माहिती भरली जाते. यासाठी पालकवर्ग जास्त आग्रही झाला आहे.

मात्र, त्यांना फसविण्यासाठी या मॅट्रिमोनियल साईट आता सर्व हद्द पार करू लागल्या आहेत. एका मॅट्रिमोनियल साईटनेतर थेट व्हर्जिनटीची गॅरंटी देण्यास सुरुवात केली आहे.

लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी Shadi.com नावाच्या वेबसाईटवर अशाचप्रकारे जाळे टाकण्यात येत आहे. प्रेम आणि विश्वासाऐवजी कौमार्यावरून लोकांना आकर्षित करण्याचा गोरखधंदाच उघडण्यात आला आहे. या वर टीकाही होऊ लागली आहे.

महत्वाचे म्हणजे लग्नाळूंसाठी लोकप्रिय असलेल्या शादी.कॉमपेक्षा ही वेबसाईट वेगळी आहे. दोन्हींच्या नावात फक्त एकाच अक्षराचा फरक आहे. लोकप्रिय वेबसाईटचे युआरएल Shaadi.com असे आहे.

दुसऱ्या Shadi.com या वेबसाईटवर व्हर्जिन मॅट्रिमोनीचा उल्लेख करण्यात आला आहे. एवढेच नाही तर एक पेजच या विषयासाठी तयार करण्यात आले आहे. अनेकजण असे आहेत की त्यांची मानसिकता या गोष्टींमध्ये अडकलेली आहे. याचाच फायदा ही शादी डॉट कॉम घेत आहे.

प्रत्येक वेबसाईटवर एक क्रायटेरिया असतो त्याप्रमाणे या वेबसाईटवरही क्रायटेरिया तयार करण्यात आला आहे. यामध्ये व्हर्जिनिटीचा ऑप्शन देण्यात आला आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर ‘ऑडनारी’ यांनी या शादी डॉट कॉमच्या अधिकृत फेसबुक पेजवर संपर्क साधला. यामागे काय उद्देश आहे याची माहिती त्यांनी विचारली. यावर या वेबसाईटने आश्चर्यचकित करणारे उत्तर दिले.

आमच्या पेजवर अशाप्रकारची कोणतीही सेवा असेल याची आम्हाला माहिती नाही. यानंतर ‘ऑडनारी’ने त्यांना स्क्रीनशॉट पाठविल्यावर त्यांची बोलती बंद झाली. यावर त्यांनी आमचे मार्केटिंगचे लोक कधी कधी जरा जास्तच पुढे जातात. आम्ही हे पेज डिलीट करू, कारण याला काहीही अर्थ नाहीय, असे उत्तर दिले.

तुमच्या वेबसाईटवर हा गोरखधंदा काही काळापासून सुरु आहे, याकडे कोणाचे लक्ष गेले नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर संबंधित व्यक्ती याचे उत्तर तुम्हाला पाठवतील. आमची चुकी झाली आहे. जसे त्यांचे उत्तर येईल तसे आम्ही ते प्रसिद्ध करू असे या वेबसाईटने सांगितले आहे.

व्हर्जिनिटी हा वादाचा विषय आहे. एखाद्या मुलीची कौमार्य चाचणी करण्याचा प्रथा महाराष्ट्रातील एका समाजामध्ये आहे. याला त्यांच्याच समाजातील सुधारणावादी तरुण-तरुणींकडून विरोध होत आहे. काही वर्षांपूर्वी या समाजातील तरुण-तरुणींना ही प्रथा डावलून लग्न केले होते.

व्हर्जिनिटी म्हणजेच कौमार्य. हा एक असा विषय आहे जो मुलींशी संबंधीत आहे. लग्न होईपर्यंत मुलींनी शारिरिक संबंध ठेवायचा नाही. शारिरिक संबंध ठेवेपर्यंत त्या व्हर्जिन असतात. मुलींना त्यांचे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी कौमार्य जपावे लागते. या कुप्रथेवरून टीकाही होत आहे.

अनेकदा या कौमार्यावरून मुलींना घालून पाडूनही बोलले जाते. परदेशात तर कौमार्य लाखो डॉलरला विकण्याचे प्रकारही घडले आहेत.