...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 03:23 PM2020-07-15T15:23:34+5:302020-07-15T15:32:53+5:30

Sushant Singh Rajput suicide सुशांतसिंग राजपूत हा गटबाजी आणि त्याच्याकडून सिनेमे काढून घेऊन दुसऱ्याला दिल्यामुळे त्रस्त होता. यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले होते, असा आरोप अनेकांनी केला आहे.

Where was Sushant Singh Rajput when Bollywood went to meet Modi? Rupa Ganguly's questions | ...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल

...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल

Next

बॉलीवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येला महिना उलटून गेला तरीही बॉलिवूडमधील वागणुकीचा वाद काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सुशांत हा बॉलिवूमधील बड्या हस्तींच्या हस्तक्षेपाचा बळी ठरल्याचे अनेक लोकांना वाटत आहे. यावर या हस्तींविरोधात अनेक दिग्दर्शक, अभिनेत्यांनी आवाज उठविला आहे. यावरून पोलिसांनी या हस्तींनाही चौकशीसाठी बोलावले आहे. अद्य़ाप सुशांत प्रकरणाचा तपास पूर्ण झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार रुपा गांगुली यांनी खळबळजनक प्रश्न विचारले आहेत. 


सुशांतसिंग राजपूत हा गटबाजी आणि त्याच्याकडून सिनेमे काढून घेऊन दुसऱ्याला दिल्यामुळे त्रस्त होता. यातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले होते, असा आरोप अनेकांनी केला आहे. यामध्ये कंगना रानावतनंतर आता रुपा गांगुली यांनी टीका केली आहे. तसेच सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. 


रुपा गांगुली यांनी काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी आलेल्या बॉलिवूड कलाकारांच्या चमूचा फोटो पोस्ट करून करण जोहरला प्रश्न विचारला आहे. करण जोहरच्या चार्टर्ड विमानाने हे कलाकार मुंबईहून दिल्लीला आले होते, यामध्ये सुशांत होता का? असा प्रश्न विचारला आहे. पुढील ट्विटमध्ये गांगुली यांनी लिहिले आहे की, डिसेंबर 2018 ते जानेवारी 2019 मध्ये माननीय़ पंतप्रधान बॉलिवूडच्या कलाकारांना कितीवेळा भेटले? त्यामध्ये सुशांत होता का? असा प्रश्न विचारला आहे. यानंतर गांगुली य़ांनी पुन्हा प्रश्न करत या बॉलिवूड कलाकारांच्या भेटीचे नियोजन कोणी केले होते? की संपर्क साधला होता? पंतप्रधानांना भेटण्याची एक पद्धत असते. प्रोटोकॉल असतो. त्यानुसार मला विश्वास आहे की सुशांत सारख्या प्रतिभावान कलाकाराला नक्कीच टाळण्यात आले नसते. मग ही यादी कोणी बनविली होती? असा सवाल करून त्यांनी पंतप्रधान कार्यालयालाही यामध्ये ओढले आहे. जर सुशांत या भेटीला असता तर त्याचा मोदींसोबत एकही फोटो का नाहीय? असा प्रश्न विचारला आहे. गांगुली यांनी मोदींच्या शपथविधी कार्यक्रमातील फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये सुशांत कपिल शर्मा आणि करण जोहरच्या मध्ये बसलेला आहे. मोदी अशा लोकांना भेटण्यासाठी उत्सुक असतात. या समारंभाची यादी पंतप्रधान कार्यालयाने बनविली होती. यामध्ये तर सुशांत होता. मग त्या भेटीवेळी का नव्हता , असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे,. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

सोने स्वस्त झाले! झटपट जाणून घ्या आजचे दर

फ्लिपकार्टचा कोरोनाकाळात चौकार! 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक; बाजारमुल्य $24.9 अब्जांवर

एकतर सैन्याची नोकरी सोडा किंवा फेसबुक; याचिकाकर्त्या लेफ्टनंट कर्नलला न्यायालयाने सुनावले

बापरे! लग्नासाठी व्हर्जिनीटीची गॅरंटी देतेय मॅट्रिमोनियल साईट Shadi.com; विचारताच माफी मागितली

'वर्क फ्रॉम होम' काळात SBI चा मोठा निर्णय; तब्बल 1000 कोटी रुपये वाचणार

Xiaomi आता 'हवा' देखील भरणार; टायर पंक्चर झाल्यास काही क्षणांत मदतीला येणार

रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार; मुंबई महापालिकेच्या पथकाला दरवाजाही उघडला नाही

क्रूरतेचा कळस! चीनने गलवानमध्ये मृत सैनिकांचे बलिदान नाकारले; अंत्यसंस्कारास नकार

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Where was Sushant Singh Rajput when Bollywood went to meet Modi? Rupa Ganguly's questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app