...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 04:31 PM2020-07-15T16:31:47+5:302020-07-15T16:33:25+5:30

जपान, स्पेन, इटली, थायलंड, पोर्तूगाल, दक्षिण कोरिया, पोलंडसह जवळपास 20 देशांमध्ये पुढील 80 वर्षांत लोकसंख्या निम्मी होणार आहे. चीनची लोकसंख्या 80 वर्षात 1 अब्ज 40 कोटींवरून कमी होऊन 73 कोटी होणार आहे. म्हणजेच ही लोकसंख्या निम्म्य़ाने कमी होणार आहे. 

... then population of the earth will decrese by 2 billion; Big warning after Corona epidemic | ...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा

...तर 2 अब्जांनी पृथ्वीवरील लोकसंख्या कमी होईल; कोरोना महामारीनंतर मोठा इशारा

Next

पृथ्वीवरील लोकसंख्या कमालीची वाढत चालली आहे. मात्र, येणारा काळ यावर उत्तर देणार आहे. वॉशिंगटन यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार मोठा अंदाज लावण्य़ात आला आहे. यामध्ये येत्या काळात पृथ्वीवरील लोकसंख्या थोडी थोडकी नव्हे तर 2 अब्जांनी कमी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


आज 2020 हे वर्ष सुरु आहे. आजपासून जवळपास 80 वर्षांनी म्हणजेच 2100 मध्ये 8 अब्ज 80 कोटी असणार आहे. हा आकडा संयुक्त राष्ट्रांनी लावलेल्या अंदाजापेक्षा 2 अब्जांनी कमी आहे. हा रिसर्च Lancet जर्नलमध्ये छापून आला आहे. प्रजनन दर घटल्याने आणि एकूण लोकसंख्येपैकी अधिकाधिक लोक हे वृद्धत्वाकडे झुकल्याने जगाच्या लोकसंख्येमध्ये हळू हळू वाढ होणार आहे. सध्या जगाची लोकसंख्या 7 अब्ज 80 कोटी एवढी आहे.

या अभ्यासानुसार 195 देशांपैकी 183 देशांमध्ये लोकसंख्या घटणार आहे. यामागे मोठ्या संख्येने स्थलांतर रोखणे हे कारण सांगण्य़ात आले आहे. 
जपान, स्पेन, इटली, थायलंड, पोर्तूगाल, दक्षिण कोरिया, पोलंडसह जवळपास 20 देशांमध्ये पुढील 80 वर्षांत लोकसंख्या निम्मी होणार आहे. चीनची लोकसंख्या 80 वर्षात 1 अब्ज 40 कोटींवरून कमी होऊन 73 कोटी होणार आहे. म्हणजेच ही लोकसंख्या निम्म्य़ाने कमी होणार आहे. 


तर सहारा आणि आफ्रिकेची लोकसंख्य़ा जवळपास तिप्पट होणार असून ती तब्बल 3 अब्जांवर जाणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. तर भारत एक अब्ज 10 कोटींवर असणार आहे. नायजेरियाची लोकसंख्या 80 कोटी होणार आहे. या टीमचे प्रमुख संशोधक ख्रिस्तोफर मुरेय सांगतात की, ही माहिती पर्यावरणासाठी चांगली आहे. यामुळे अन्न उत्पादनावरील दबाव कमी होणार आहे. कार्बनचे उत्सर्जनही कमी होईल. मात्र, अनेक देशांना लोकसंख्या घटल्य़ावर समस्यांचा सामना करावा लागणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

...तेव्हा सुशांत कुठे होता? मोदी भेटीवरून भाजपा खासदाराचा बॉलिवूडकरांना सवाल

सोने स्वस्त झाले! झटपट जाणून घ्या आजचे दर

फ्लिपकार्टचा कोरोनाकाळात चौकार! 1.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक; बाजारमुल्य $24.9 अब्जांवर

एकतर सैन्याची नोकरी सोडा किंवा फेसबुक; याचिकाकर्त्या लेफ्टनंट कर्नलला न्यायालयाने सुनावले

बापरे! लग्नासाठी व्हर्जिनीटीची गॅरंटी देतेय मॅट्रिमोनियल साईट Shadi.com; विचारताच माफी मागितली

'वर्क फ्रॉम होम' काळात SBI चा मोठा निर्णय; तब्बल 1000 कोटी रुपये वाचणार

Xiaomi आता 'हवा' देखील भरणार; टायर पंक्चर झाल्यास काही क्षणांत मदतीला येणार

रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार; मुंबई महापालिकेच्या पथकाला दरवाजाही उघडला नाही

क्रूरतेचा कळस! चीनने गलवानमध्ये मृत सैनिकांचे बलिदान नाकारले; अंत्यसंस्कारास नकार

Web Title: ... then population of the earth will decrese by 2 billion; Big warning after Corona epidemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.